Tuesday, January 18, 2022

चित्रा वाघ संतापल्या :मंत्री थोरातांना अशा गंभीर मुद्द्यांवर बोलण्यासाठी वेळ नाही

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या ऑडिओ क्लिपमुळे राज्यातील महिलांच्या समस्यांना वाचा फुटली आहे. या प्रकरणामुळे देवरे संपलेल्या नाहीत, त्या जिवंत आहेत मात्र त्यांच्या जिवंत वेदनांची किंमत राज्य सरकारला कळली नाही. त्यांची विचारपूस करून दोन वाक्य बोलण्याची सुबुद्धी सरकारला मिळाली नसल्याचे सांगतानाच

या मुद्द्यावर नगर जिल्ह्यातील नेते, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात बोलतील अशी अपेक्षा होती परंतु अशा गंभीर मुद्द्यांवर बोलण्यासाठी त्यांच्याकडेही वेळ नाही ही दुर्दैवाची बाब असल्याची खंत व्यक्त करीत शंभर कोटी रुपये गोळा करण्यात राज्य सरकार बिझी असल्यानेच महिला आयोगाला अडीच वर्षात अध्यक्ष मिळाला नसल्याची खंत भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केली.

पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी ऑडिओ क्लिपद्वारे आत्महत्येचा इशारा दिल्यानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. याप्रकरणी पहिल्याच दिवशी भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी देवरे यांची पाठराखण केली होती. आज त्यांनी पारनेर येथे येऊन तहसीलदार देवरे यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी भानुदास बेरड, मिलिंद भैय्या गंधे, सुजित झावरे,वसंत चेडे, अश्विनी थोरात, सुभाष दुधाडे, सुनिल थोरात, सागर मैड आदी उपस्थित होते.यावेळी पत्रकारांशी बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या की, एका महिला अधिकाऱ्याला झालेल्या त्रासाची दखल घ्यायला सरकारकडे वेळ नाही ही दुर्दैवाची बाब आहे.भाजपाचे तालुका व जिल्ह्यातील पदाधिकारी आपल्या संपर्कात असल्याने पहिल्या दिवसापासूनच आपण या प्रकरणात लक्ष घातले होते.

राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून या गंभीर प्रकरणात लक्ष घालण्याची मागणी केली होती मात्र,तीन पक्षाच्या सरकारमधील एकाही पक्षाने याप्रकरणी लक्ष घातले नसल्याची खंतही चित्रा वाघ यांनी व्यक्त केली.

ताज्या बातम्या

भेंड्यात बिबट्याकडून शेळीचा फडशा

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर सुरु झाला असून सोमवारी सांयकाळी 7 वाजेच्या सुमारास बिबट्याने भेंडा-देवगाव रस्त्यावरील श्रीकांत भिमराज शिंदे यांचे वस्तीवर अंगणात बांधलेल्या...

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...
error: Content is protected !!