Friday, January 21, 2022

पारनेरची यंत्रणा आ. लंकेच्या दावणीला बांधली काय ?

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:प्रातांधिकार्‍यामार्फत अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली जाते. पोलीस अधिकार्‍यासमोर मारहाण केली जाते. जिल्हाधिकारी फक्त चौकशी सुरू असल्याचे साचेबध्द उत्तर देतात. पारनेर तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणा राष्ट्रवादीचे

आ. निलेश लंके यांच्या दावणीला बांधली आहे काय? असा सवाल भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी नगर येथे केला. राज्यातील सत्ताधारी आमदारांच्या बाबतीतच हे सगळे का घडते असा सवाल करतानाच राज्यातील पोलीस यंत्रणाच सत्तेच्या दावणीला बांधली का? याचे उत्तर राज्य सरकारने द्यावे, अशी मागणी वाघ यांनी केली.

भाजपा नेत्या वाघ यांनी मंगळवारी पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे , ग्रामीण रूग्णायाचे डॉक्टर, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य प्रा. भानुदास बेरड, शहरजिल्हाध्यक्ष भैय्या गंधे, सचिन पारखी, नगर शहर महिला अध्यक्षा अंजली वल्लाकट्टी यावेळी उपस्थित होत्या.

देवरे यांच्यावरील आरोपाची चौकशी महसूल यंत्रणा करेल. त्याबरोबर की चुकीच्या हे चौकशीत ठरेल, पण पोलिसांसमक्ष महिला आरोग्य अधिकार्‍यांनी शिवीगाळ करणे, क्लार्कला मारहाण करणे, महसुलच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना शिवीगाळ करून मारहाण करण्याचे अधिकार आ. लंकेंना कोणी दिले.

हे सगळे डोळ्यादेखत होत असताना पोलीस यंत्रणा गप्प का? ती आ. लंकेच्या दावणीला बांधली आहे का? याचे उत्तर सरकारने जनतेला द्यावे, अशी मागणी वाघ यांनी केली. जिल्हाधिकार्‍यांकडे विचारणा केली तर ते चौकशी सुरू आहे, इतकेच साचेबध्द उत्तर देत आहेत. चौकशी अहवाल लिक कसा झाला? असा सवालही वाघ यांनी केला.

राज्यातील पोलीस महिलांच्या बाजूने उभे राहण्याऐवजी सत्ताधारी आमदारांना साथ देत असल्याचा आरोप वाघ यांनी केला. देवरे या खंबीर झाल्या आहेत. लढेंगे, भिडेंगे, जितेंगे या भूमिकेतून त्या वावरत असल्याने त्यांचे अभिनंदन.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!