Monday, January 17, 2022

नगर जिल्ह्यातील दोन दूध संकलन केंद्रावर छापा, १ हजार ३०३ लिटर भेसळ युक्त दूध नष्ट

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

 

माय महाराष्ट्र न्यूज:राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी येथील दोन दूध संकलन केंद्रावर अन्न औषध प्रशासनाने छापा मारून १ हजार ३०३ लिटर भेसळयुक्त दूध असा एकूण ५०,२६४ रुपये किंमतीचे भेसळयुक्त दूध नष्ट करून दोन दूध संकलन केंद्रावर कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर माहीती अशी की मंगळवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी ब्राह्मणी येथील जालिंदर ठकाजी वने यांच्या गोठ्यात छापा टाकला असता या ठिकाणी दूध भेसळीसाठी साठवलेली व्हे पावडर ५८ किलो लाईट

लिक्विड प्याराफीन (पावर ऑइल १७० किलो) भेसळयुक्त गाईचे दूध ५३ लिटर असा एकूण १८,५२४ रु किंमतीचा साठा जप्त केला सदर भेसळयुक्त दुधाचे व्हे पावडर ,लाईट लिक्विड प्याराफीनचे नमुने विश्लेषण तपासणी साठी घेण्यात आले आहे तर भेसळयुक्त दूध जागेवर नष्ट करण्यात आले.दुधात भेसळ करण्यासाठी वापरण्यात

येणारे पदार्थ जप्त करण्यात आले आहे.जालिंदर वने हा दररोज १७० लिटर दुध डेअरीस पुरवठा करत होता प्रत्यक्षात मात्र त्याच्या गोठयातुन १०० लिटर पेक्षा कमी दूध मिळत असल्याचे निदर्शनास आले.वने हा ७० लिटर पेक्षा भेसळयुक्त दूध तयार करून दोन दूध संकलन केंद्रात पुरवठा करत होता त्यामध्ये मुक्ताई दूध संकलन केंद्र ब्राह्मणी , श्रीनिवास दूध संकलन केंद्र शनी शिंगणापूर रोड ब्राह्मणी यांचा समावेश आहे.

मुक्ताई डेअरीचे चालक दिगंबर गंगाधर पठारे यांच्या दूध संकलन केंद्रावर दुधाचे नमुने तपासण्यासाठी घेऊन ८०० लिटर दुध अंदाजे किंमत २० हजार रुपये तर श्रीनिवास दूध संकलन केंद्राचे प्रकाश शिवाजी नगरे याच्या दूध संकलन केंद्रावर छापा मारून दूध भेसळीचे नमुने तपासणीसाठी घेतले ११,७०० रुपये किंमतीचे ४५० लिटर दुध भेसळीच्या कारणावरून जागेवर नष्ट केले.

या कारवाईत अन्न औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त संजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख उपस्थितीत अन्न सुरक्षा अधिकारी प्रदीप कुटे, शरद पवार, उमेश सूर्यवंशी, प्रदीप पवार यांनी कारवाई केली आहे.

ताज्या बातम्या

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...

या आमदाराची जीभ घसरली! रस्ते कंगना राणौतच्या गालापेक्षा चांगले करणार

माय महाराष्ट्र न्यूज:अभिनेत्री कंगणा रणौतविषयी वादग्रस्त वक्तव्य करून काँग्रेस आमदार डॉ. इरफान अन्सारी वादात सापडण्याची शक्यता आहे. जामताडामधील रस्ते कंगना रणौतच्या गालापेक्षाही चिकने बनवले...
error: Content is protected !!