Tuesday, January 18, 2022

खा. सुजय विखे व संचालक कामगाराच्या मयतीला येणार आहे का ?

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:डाँ.तनपुरे कारखान्याच्या कामगारांच्या उपोषणाकडे खा.डाँ.सुजय विखे यांच्यासह संचालक मंडळ व युनियन व कृती समिती पदाधिकारी आदींनी पाठ फिरविल्याचा निषेध केल्याची बातमी सोशल मिडीयावर फिरताच युनियन व कृती समितीचे पदाधिकारी

यांनी खा.विखे यांच्याबरोबर झालेल्या चर्चेचा तपशिल उपोषणकर्ते कामगारांसमोर मांडला. उपोषणकर्ते कामगारांनी युनियन व कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले आहे.दोन्ही समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दुटपी भुमिका बंद करुन गाजर दाखवित असल्याबद्दल खेद व्यक्त केला.

डाँ.तनपुरे कारखान्याच्या कामगारांनी सोमवार पासुन उपोषण सुरु केले आहे. मंगळवारी सकाळी खा.डाँ.सुजय विखे यांनी संचालक मंडळाची बैठक घेतली. बैठकी नंतर युनियन व कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांशी नर्सिंग होमच्या प्रागंणात चर्चा केली.

खा.विखे यांच्यासह संचालक व युनियन, कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यां कामगाराकडे पाठ फिरविली. याचा उपोषणकर्त्या कामगारांनी जाहीर धिक्कार करुन निषेध केला. याचे वृत्त सोशल मिडीयावर दिसताच युनियन व कृती समितीचे पदाधिकारी उपोषणस्थळी हजर झाले.

यावेळी खा.डाँ.विखे यांच्या समवेत झालेल्या चर्चेचा तपशिल युनियचे पदाधिकारी अर्जुन दुशिंग उपोषणकर्त्या समोर मांडताना सांगितले की,विखे यांनी संचालक मंडळाची बैठक घेतली आहे.कामगारांच्या पोटापाण्याचा प्रश्न असल्याने संचालक व कामगार यांच्या मध्यस्थाची भुमिका युनियन पार पाडीत आहे.कामगारांनी त्याग केला आहे.

युनियनचे पदाधिकारी न्याय मिळावा म्हणून प्रयत्न करीत आहे.खा.विखे यांनी सांगितले की, कामगारांचे 25 कोटी 36 लाख देणी नाही.जी देणी आहे हिशोब पाहुण देण्यात येईल.7 मे पासुन कोरोनामुळे कामगारांना कमी केले आहे.प्रवरा व कोपरगावचे कामगार तनपुरे कारखान्यात कामावर घेतले आहे.आँगस्ट उजडला तरी राहुरीच्या कामगारांना कामावर घेतले नाही.

त्यासाठी युनियन प्रयत्न करीत आहे.सरकारने कारखान्यावर प्रशासक आणला तर पैसे गुंतवायचे की नाही. या बाबत दोन दिवस निर्णय घेण्यासाठी वेळ खा.विखेंनी मागितली आहे.कामगारांची संपुर्ण माहिती समोर आल्यावरच उपोषणकर्त्यांना भेटणार असल्याचे खा.विखे यांनी सांगितले आहे. असे दुशिंग यांनी सांगितले.

कामगार कृती समितीचे पदाधिकारी चंद्रकांत कराळे म्हणाले की, कामगार मेटाकुटीस आला आहे. पोटात दुःखत असल्याने उपचारासाठी उपोषण सुरु केले आहे.कामगारांच्या हातात काहीतरी मिळाले पाहिजे.कामगारांचा भविष्य निर्वाह रक्कम भरली जात नाही. कारखाना ताब्यात राहणार आहे की नाही हे येत्या दोन दिवसात स्पष्ट होईल.खा.विखे सकारत्मक तोडगा काढतील असे कराळे यांनी सांगितले.

उपोषणकर्ते कामगार नेते इंद्रभान पेरणे यांनी सांगितले की,कामगार प्रशासनातील मध्यस्थतीची भुमिका युनियन व कृती समिती करत आहे. युनियन व कृती समिती प्रशासनाच्या वतीने येवून गाजर दाखवित असल्याने त्याचा सर्व कामगारांच्या वतीने खेद व्यक्त करीत आहोत. खा.विखे उपोषणकर्त्या कामगारांसमोरुन गेले.

आमच्याकडे पाठ फिरविता हा कामगारांचा अपमान नाही का? हि खेदाची गोष्ट आहे.खा.विखे व संचालक मंडळ कामगाराच्या मयतीला येणार आहे का ? असा सवाल करत युनियन कामगारांबरोबर आहे तर उपोषणकर्त्या कामगारांबरोबर का दिसत नाही असे पेरणे म्हणाले.

ताज्या बातम्या

भेंड्यात बिबट्याकडून शेळीचा फडशा

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर सुरु झाला असून सोमवारी सांयकाळी 7 वाजेच्या सुमारास बिबट्याने भेंडा-देवगाव रस्त्यावरील श्रीकांत भिमराज शिंदे यांचे वस्तीवर अंगणात बांधलेल्या...

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...
error: Content is protected !!