Tuesday, January 18, 2022

या’ आठवड्यात 4 दिवस बँका बंद

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:येत्या काही दिवसांत जर तुम्ही बँकेशी संबंधित कोणतेही महत्त्वाची काम करणार असाल, तर तुम्ही ती तात्काळ उरका, अन्यथा तुम्हाला बराच काळ थांबावे लागेल. कारण या आठवड्यात बँका सलग 4 दिवस बंद राहणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) ऑगस्ट 2021 महिन्यासाठी बँक सुट्ट्यांची यादी जारी केली होती.

आता या महिन्यात फक्त चार सुट्ट्या बाकी

या महिन्यात एकूण 15 सुट्ट्या होत्या. कॅलेंडर महिना जसजसा पुढे सरकत गेला, तशा सुट्ट्या आल्या आणि गेल्या. आता या महिन्यात फक्त चार सुट्ट्या बाकी आहेत. या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात 28 ऑगस्ट ते 31 ऑगस्टपर्यंत बँका बंद राहतील. या काळात ऑनलाईन बँकिंग सेवा आणि एटीएम सेवा कार्यरत राहतील.

राज्यांमध्ये वेगवेगळ्या झोनसाठी बँक सुट्टीची यादी जारी

आरबीआय स्थानिक सणांमुळे वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या झोनसाठी बँक सुट्टीची यादी जारी करते. RBI ने या आठवड्यात बँकांमध्ये 4 दिवस सुट्टी निश्चित केलीय. ही सुट्टी प्रत्येक राज्यातील बँकांसाठी नाही.

30 ऑगस्टला अनेक शहरांमध्ये बँका बंद राहणार

जन्माष्टमी/कृष्ण जयंती 30 ऑगस्ट 2021 रोजी आहे. या दिवशी अनेक शहरांतील बँका बंद राहतील. या दिवशी अहमदाबाद, चंदीगड, चेन्नई, डेहराडून, जयपूर, जम्मू, कानपूर, लखनऊ, पाटणा, रायपूर, रांची, शिलाँग, शिमला, श्रीनगर आणि गंगटोक या बँकांमध्ये कोणताही व्यवसाय होणार नाही.

याशिवाय या महिन्याच्या चौथ्या शनिवारी 28 ऑगस्टला सुट्टी असेल. 29 ऑगस्टला रविवार आहे. यामुळे देशभरातील सर्व बँका बंद राहतील. त्याच वेळी 31 ऑगस्ट 2021 श्री कृष्ण जन्माष्टमीमुळे हैदराबादच्या बँकांमध्ये कोणतेही काम होणार नाही.

ताज्या बातम्या

भेंड्यात बिबट्याकडून शेळीचा फडशा

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर सुरु झाला असून सोमवारी सांयकाळी 7 वाजेच्या सुमारास बिबट्याने भेंडा-देवगाव रस्त्यावरील श्रीकांत भिमराज शिंदे यांचे वस्तीवर अंगणात बांधलेल्या...

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...
error: Content is protected !!