Friday, January 21, 2022

नगर ब्रेकींग:भरधाव कंटनेरची दुचाकिस धडक महिला ठार ;चार महिन्यांपूर्वी झाला होता विवाह

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज :कोपरगाव शहराच्या पूर्वेस हाकेच्या अंतरावर असलेल्या नगर-मनमाड राज्य मार्गावर असलेल्या व गोदावरी नदीवर नव्याने बांधण्यात आलेल्या पुलावर आज दुपारी ०३ वाजेच्या सुमारास आपल्या देशमाने ता.येवला येथील माहेराहून आपले

रक्षाबंधन आटोपून आपल्या भावाबरोबर परत आपल्या मालुंजे खुर्द ता.श्रीरामपूर येथील सासरी जात असताना समोरून येणाऱ्या भरधाव वेगाने येणाऱ्या राजस्थान येथील कंटेनरने (क्रं.आर.जे.०६,जी.सी.७८११) दिलेल्या धडकेत मागील बाजूस बसलेली नवविवाहित महिला प्रियांका सचिन सोळंके (वय-अंदाजे १९) ठार झाली असल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

आपले माहेर असलेल्या येवला तालुक्यातील संबंधित महिला प्रियंका सचिन सोळंके हिचे नुकतेच चार महिन्यांपूर्वी श्रीरामपूर तालुक्यातील मालुंजे खुर्द येथील मुलाशी लग्न झाले होते.मात्र नुकतीच २० ऑगष्ट रोजी राखी पौर्णिमा सण साजरा झाला असून त्यासाठी संबधीत महिला हि माहेरी आली होती.

तिला पोहचविण्यासाठी  तिचा भाऊ (नाव उपलब्ध झाले नाही) आपल्या दुचाकीवर घेऊन चालला असताना आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास समोरून येणाऱ्या अवजड कन्टेनरने त्यांच्या दुचाकीस जोराची धडक दिली त्यात या महिलेचे निधन झाले आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,आपले माहेर असलेल्या येवला तालुक्यातील संबंधित महिला प्रियंका सचिन सोळंके हिचे नुकतेच चार महिन्यांपूर्वी श्रीरामपूर तालुक्यातील मालुंजे खुर्द येथील मुलाशी लग्न झाले होते.मात्र नुकतीच २० ऑगष्ट रोजी राखी पौर्णिमा सण साजरा झाला असून त्यासाठी संबधीत महिला हि माहेरी आली होती.

तिला पोहचविण्यासाठी आज तिचा भाऊ (नाव उपलब्ध झाले नाही) आपल्या दुचाकीवर घेऊन चालला असताना आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास समोरून येणाऱ्या अवजड कन्टेनरने त्यांच्या दुचाकीस जोराची धडक दिली.त्यात सम्बधित महिला जागीच ठार झाली आहे.या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात कंटेनर

चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.घटनेनंतर कंटेनर चालक फरार झाला आहे.या दुर्घटनेस पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी दुजारा दिला आहे.कोपरगाव शहर पोलिसानी या प्रकरणी अज्ञात कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहर पोलीस करत आहेत.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!