Monday, January 17, 2022

नगर ब्रेकींग:बिबट्याचा हल्ला! तीन वर्षीय बालिका ठार

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात एकाच पंधरवड्यात, एकाच परिसरात सलग दुसऱ्यांदा बिबट्याने लहान मुलांवर हल्ला केला आहे. मागच्यावेळी झुंजार मातेने आपल्या काळजाच्या तुकड्याला बिबट्याच्या जबड्यातून वाचविले होते.

यावेळी मात्र त्याच परिसरातील तीन वर्षीय बालिकेला मदत मिळण्‍यापूर्वीच बिबट्याने तिचा बळी घेतला आहे. या घटनेने धांदरफळ खुर्द परिसरात बिबट्याची प्रचंड दहशत निर्माण झाली असून या घटनेत निष्पाप बालिकेचा बळी गेल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील धांदरफळ खुर्द शिवारातील साकूर मळा परिसरात आज (ता.24) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. येथील वाकचौरे कुटुंबीय आपल्या शेतातील मका कापणीत व्यस्त असताना घराच्या अंगणात शिवांगी संतोष वाकचौरे ही तीन वर्षांची मुलगी एकटी खेळत होती.

यावेळी जवळच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याची नजर तिच्यावर खिळली. सावज हेरुन बिबट्याने या चिमुरडीवर हल्ला केला. यावेळी झालेल्या झटापटीच्या आवाजाने शिवानीच्या आई-वडिलांचे लक्ष वेधले गेल्याने त्यांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. त्यामुळे सैरभैर झालेला बिबट्या बाजूच्या शेतात उडी मारुन पळून गेला.

बिबट्याच्या हल्ल्यात अत्यवस्थ झालेल्या तीन वर्षीय बालिकेला तिच्या आई-वडिलांसह अन्य नातेवाईकांनी तातडीने खाजगी वाहनातून संगमनेरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र या इवल्याशा जीवावर इतक्या मोठ्या जनावराने हल्ला केल्याने तिच्या शरीरावर खोलवर जखमा झाल्या.

त्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीच त्या तीन वर्षीय चिमुरडीचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केल्यानंतर तिच्या आई-वडिलांसह नातेवाईकांनी रुग्णालयात हंबरडा फोडला. हा प्रसंग पाहणाऱ्या प्रत्येकाच्या हृदयाला पीळ पडला होता.

या घटनेची माहिती मिळताच संगमनेर उपविभागाचे उपविभागीय वनाधिकारी संदीप पाटील यांनी आपल्या कर्मचार्‍यांसह धांदरफळ खुर्द परिसरात जाऊन पाहणी केली. यावेळी सरपंच रोहिदास खताळ यांनी बिबट्याचे वाढते हल्ले आणि परिसरातील बिबट्याचा सातत्याचा संचार यामुळे नागरिकांमध्ये

भीतीचे वातावरण तयार झाल्याचे सांगितले. त्यामुळे वनविभागाने तातडीने परिसरात पिंजरा लावावा व नरभक्षक होऊ पाहणाऱ्या बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी त्यांनी केली.

ताज्या बातम्या

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...

या आमदाराची जीभ घसरली! रस्ते कंगना राणौतच्या गालापेक्षा चांगले करणार

माय महाराष्ट्र न्यूज:अभिनेत्री कंगणा रणौतविषयी वादग्रस्त वक्तव्य करून काँग्रेस आमदार डॉ. इरफान अन्सारी वादात सापडण्याची शक्यता आहे. जामताडामधील रस्ते कंगना रणौतच्या गालापेक्षाही चिकने बनवले...
error: Content is protected !!