Tuesday, January 18, 2022

कोरोनाबाबत WHO कडून सर्वात दिलासादायक बातमी

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: जगभरात कोरोनाचं सावट अजूनही कायम आहे. एकीकडे डेल्टा आणि डेल्टा प्लस या व्हेरिएंटचा जगातील काही देशांमध्ये संसर्ग वाढत असताना भारतासाठी मात्र काहीसा दिलासा आहे. ऑक्टोबर महिन्यात तिसरी लाट येणार असंही सांगितलं जात आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी एक दिलासादायी गोष्ट सांगितली आहे. भारतात कोरोना एन्डेमिक स्टेजवर येण्याच्या मार्गावर आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन यांच्या म्हणण्यानुसार कोरोनाचा धोका पूर्णपणे संपुष्टात आतातरी येणार नाही.

मात्र या कोरोनाच्या संसर्गासोबत जगू शकतील. भारतात मात्र सध्या आणि पुढील काळात कदाचित कोरोना हा सौम्य किंवा मध्यम स्वरुपातल्या संसर्ग स्थितीत असू शकतो. एन्डेमिक म्हणजे जिथे लोकं संसर्गासह जगणं शिकू लागतात. थोडक्यात संसर्गाचा प्रभाव काहीसा ओसरतो. असंही त्या म्हणाल्या आहेत.

वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार भारतातील लोकसंख्या अधिक आहे. संपूर्ण परिस्थितीचा विचार करता कोरोनाची स्थितीतही चढ-उतार पाहायला मिळू शकतात. मात्र येत्या काळात लोक या संसर्गासह जगणं शिकतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे. 2022 च्या अखेरपर्यंत आपण 70 टक्के लोकांचं लसीकरण पूर्ण केलं असेल अशा टप्प्यावर असणार आहोत.

मुलांमध्ये देखील कोरोनाचा संसर्ग हळूहळू पसरू लागला आहे. मात्र पालकांना घाबरण्याची आवश्यकता नाही असाही डॉ. सौम्या स्वामीनाथन म्हणाल्या आहेत. मुलांमध्ये कोव्हिडची सौम्य लक्षणं आढळू शकतात असं सीरो सर्व्हेमधून समोर आलं आहे. त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही असंही त्या म्हणाल्या आहेत.

भारतात कोरोना हा एन्डेमिक स्टेजवर येण्याच्या मार्गावर असल्याची शक्यता WHO च्या मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी व्यक्त केली आहे.

ताज्या बातम्या

भेंड्यात बिबट्याकडून शेळीचा फडशा

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर सुरु झाला असून सोमवारी सांयकाळी 7 वाजेच्या सुमारास बिबट्याने भेंडा-देवगाव रस्त्यावरील श्रीकांत भिमराज शिंदे यांचे वस्तीवर अंगणात बांधलेल्या...

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...
error: Content is protected !!