Tuesday, January 18, 2022

खा सुजय विखे म्हणतात जिल्ह्याचा सुंस्कृतपणा धोक्यात गरीब आमदार लाखोंच्या….

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:जिल्हा परिषदेच्या कामांमध्ये टक्केवारी वाढत चालल्यामुळे झेडपीच्यामाध्यमातून होणारी कामे जास्त दिवस टिकणार नाहीत. जिल्हा परिषदेमधील कामाची टक्केवारी कायमची बंद करायची असेल तर भाजप सरकारच्या हातात सत्ता द्या.जिल्ह्याचा सुंस्कृतपणा धोक्यात आहे.

गरीब आमदार लाखोंच्या गाडीत फिरताना दिसत आहे.2022 पर्यत जलजीवन मिशन अंतर्गत सर्वांना शुध्द पाणी मिळणार आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकारण ठेका कोणाला द्यायचा याच्यामुळे सहा महिन्यांपासून या योजनेची फाईल या सरकारने दाबून ठेवली असल्याचा असा टोला खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी या आघाडी सरकारला लगावला.

नगर तालुक्यातील आगडगाव येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन खा. डॉ. विखे पाटील यांच्याहस्ते झाले. यावेळी आ. बबनराव पाचपुते , माजी मंत्री शिवाजी कर्डिले प्रमुख उपस्थित होते. लसीकरण सेंटरवर फक्त फोटो काढणे, ते सोशल मीडियावर प्रसिद्धी माध्यमातून फ्लॅश करणे, एवढाच काहींचा उद्योग सुरू आहे.

केंद्र सरकार मात्र कोविडवर शिस्तबद्ध काम करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार दिवसाला 20 लाख लोकांचे लसीकरण करीत आहे.एखाद्या देशाची लोकसंख्याही 20 लाख नाही तेवढे लसीकरण एका दिवसात करतो आहोत. यापुढील काळात गावातील वॉर्ड तेथे लसीकरण उपक्रम प्रत्येक गावात राबवण्यात येईल.

कोविड सेंटरवर फोटो काढून ते सोशल मीडियावर व्हायरल करणार्‍या काही नेत्यांचा त्यांनी खरमरीत शब्दांत समाचार घेतला.

ताज्या बातम्या

भेंड्यात बिबट्याकडून शेळीचा फडशा

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर सुरु झाला असून सोमवारी सांयकाळी 7 वाजेच्या सुमारास बिबट्याने भेंडा-देवगाव रस्त्यावरील श्रीकांत भिमराज शिंदे यांचे वस्तीवर अंगणात बांधलेल्या...

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...
error: Content is protected !!