Thursday, January 20, 2022

पुढील 5 दिवस या 5 जिल्ह्यांना झोडपणार पाऊस

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात मान्सूनसाठी पोषक हवामान नसल्यानं राज्यात पावसानं उघडीप घेतली आहे. चालू आठवडा राज्यात सर्वत्र पावसाचं लॉकडाऊन असेल, अशी शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली होती.

तर तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळतील असंही हवामान खात्याकडून म्हटलं होतं. त्यानंतर आता पूर्व विदर्भात पावसासाठी  पोषक हवामान तयार झालं आहे. पुढील पाच दिवस पूर्व विदर्भातील पाच जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

पुढील पाच दिवस राज्यात नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या पाच जिल्ह्यांना हवामान खात्यानं येलो अलर्ट दिला आहे. त्यामुळे आजपासून 29 ऑगस्टपर्यंत पूर्व विदर्भात काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस कोसळणार आहेत. तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची जोरदार हजेरी लागण्याचीही शक्यता आहे.

दरम्यान विदर्भात ताशी 30 ते 40 किमी प्रतितास वेगानं वारा वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे.पुढील पाच दिवस राज्यात नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या पाच जिल्ह्यांना हवामान खात्यानं येलो अलर्ट दिला आहे.

त्यामुळे आजपासून 29 ऑगस्टपर्यंत पूर्व विदर्भात काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस कोसळणार आहेत. तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची जोरदार हजेरी लागण्याचीही शक्यता आहे. दरम्यान विदर्भात ताशी 30 ते 40 किमी प्रतितास वेगानं वारा वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...

तुमच्या घरात कोरोनाबाधित व्यक्ती आहे? तर या टीप्स करा, कोरोनापासून रहा सुरक्षीत

माय महाराष्ट्र न्यूज:काही दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याचे पहायला मिळत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावापासून आपला बचाव कसा करावा, तसेच जर आपल्या घरात एखाद्या...
error: Content is protected !!