Tuesday, January 18, 2022

पारनेर तहसीलदार मनमानी कारभार’, पारनेर महसूल कर्मचाऱ्यांचं कामबंद आंदोलन

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज : पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या अडचणीत वाढू लागल्या आहेत. देवरे यांच्याविरोधात आता महसूल कर्मचारी आक्रमक झाले असून तालुक्यातील तलाठी आणि तहसील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केलं आहे. देवरे यांच्या दडपशाहीला कंटाळून हे आंदोलन सुरू केल्याचं कर्मचाऱ्यांनी म्हटलं आहे.

विशेष म्हणजे यात महिला कर्मचारी देखील सहभागी झाल्या आहेत. तहसीलदार मॅडमच्या दडपशाहीला कंटाळून हे आंदोलन सुरू केल्याच कर्मचाऱ्यांनी सांगितलं आहे. तर देवरे यांच्या बदलीची मागणी करत एक तर त्यांची बदली करा नाहीतर आमची बदली करा असा पवित्रा महसूल कर्मचाऱ्यांनी घेतला आहे.

तहसीलदार देवरे या कर्मचाऱ्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करत असल्याने कर्मचाऱ्यांनी बेमुदत आंदोलन सुरू केलंय. सकाळी 11 वाजेपासून कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन सुरू केलं आहे. तालुक्यातील तलाठी, मंडळ अधिकारी आणि तहसील कर्मचाऱ्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला आहे. तर मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरु ठेवण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

आमदार निलेश लंके आणि पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्यातल्या वादावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी भाष्य केलं आहे. मला या दोघांच्याही भांडणात मध्ये पडायचं नाही पण तहसीलदार मॅडमला एवढंच सांगतो की आत्महत्येसारखा विचार बरा नाही, हा विचार डोक्यातून काढा, असा सल्ला त्यांनी तहसीलदार देवरे यांना दिला.

तहसीलदार ज्योती देवरे यांनी लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांकडून त्रासा दिला जात असल्याचा आरोप करत आत्महत्या करण्याचा इशारा दिला होता. याबाबत त्यांची एक सुसाईट ऑडिओ क्लीप व्हायरल झाली होती. पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप महिला तहसीलदार यांनी केले होते.

त्यानंतर आमदार निलेश लंके यांनी “संबधित महिला तहसीलदार यांच्यावर काही दिवसांपूर्वीच गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप लावण्यात आले आहेत. ज्यातून सुटण्यासाठी त्यांनी हा एक केविलवाना प्रयत्न केला आहे,” अशी प्रतिक्रिया देत सर्व आरोप फेटाळून लावले होते.

ताज्या बातम्या

भेंड्यात बिबट्याकडून शेळीचा फडशा

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर सुरु झाला असून सोमवारी सांयकाळी 7 वाजेच्या सुमारास बिबट्याने भेंडा-देवगाव रस्त्यावरील श्रीकांत भिमराज शिंदे यांचे वस्तीवर अंगणात बांधलेल्या...

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...
error: Content is protected !!