माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील गणेशवाडी- लक्ष्मी नगर ते भांबोरा हा ४ किलोमीटर अंतराचा रस्ता माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी त्यांच्या कार्यकाळात मंजूर केलेला आहे.
महाविकास आघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्री ग्रामसडक योजना सध्या अस्तित्वात नाही. मात्र कर्जत- जामखेडच्या लोकप्रतिनिधींनी या रस्त्याचे भूमिपूजन करून श्रेय घेण्याचा प्रयत्न केला आहे, असे भाजपाचे कर्जत तालुका उपाध्यक्ष शंकर पारखे यांनी पत्रकात म्हटले आहे.
सध्याचे लोकप्रतिनिधी हे आयत्या पिठावर रेघोट्या मारण्याचे काम करत आहेत. मतदारसंघाच्या विकासासाठी प्रा. राम शिंदे यांनी मोठा निधी आणला. भीमा पट्ट्यातील रस्ते पक्के करण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. हा निधी प्रा. राम शिंदे यांनी आणला
त्याबद्दल स्थानिक ग्रामस्थ हे प्रा. शिंदे यांचे अजूनही नाव घेत आहेत. मात्र या रस्त्याचे भूमिपूजन करून लोकप्रतिनिधींनी श्रेय घेण्याचा प्रयत्न केला असल्याचे पारखे यांनी म्हटले आहे.