Thursday, January 20, 2022

भारतामध्ये दीर्घकाळ राहील कोरोना विषाणूचा संसर्ग

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:देशात कोरोना विषाणूची प्रकरणे भलेही कमी होत असतील, परंतु जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ डॉ सौम्या स्वामीनाथन यांच्या वक्तव्याने पुन्हा चिंता वाढवली आहे. स्वामीनाथन यांनी म्हटले आहे की, भारतात कोविड-19 महामारी ही ‘स्थानिक’ टप्प्यात प्रवेश करत आहे.

जेथे कमी किंवा मध्यम पातळीवरील संसर्ग चालू आहे. एखाद्या महामारीचा स्थानिक टप्पा तेव्हा येतो जेव्हा त्या प्रदेशातील जनता व्हायरससह जगणे शिकते. हे एखाद्या साथीच्या टप्प्यापासून पूर्णपणे भिन्न आहे, जिथे विषाणू जनतेवर हावी होतो. याचा अर्थ भारताला कोरोनापासून मुक्त होण्यासाठी अजून बराच काळ प्रतीक्षा करावी लागेल.

एका मुलाखतीत स्वामीनाथन म्हणाल्या की, आपण बहुधा स्थानिक पातळीवरील संसर्गाच्या टप्प्यात प्रवेश करत आहोत. मात्र यामध्ये आपल्याला याआधी पाहिल्या गेलेल्या धोकादायक संसर्गाचा सामना करावा लागणार नाही. स्वामीनाथन यांना भारतात अशी परिस्थिती का निर्माण होत आहे? असे विचारले असता.

त्या म्हणाल्या की लोकसंख्येतील वैविध्य आणि भारताच्या विविध भागात रोग प्रतिकारशक्तीच्या स्थितीमुळे हे घडत आहे. ही अस्थिर परिस्थिती अशीच चालू राहण्याची शक्यता आहे.त्यांनी आशा व्यक्त केली की 2022 च्या अखेरीस देशात 70 टक्के लसीकरणाचे लक्ष्य साध्य केले जाऊ शकेल आणि त्यानंतर देशातील परिस्थिती सामान्य होईल.

मुलांमध्ये कोरोनाच्या संसर्गाबाबत स्वामीनाथन म्हणाल्या की, पालकांनी घाबरण्याची गरज नाही. आम्ही सीरो सर्वेक्षण पाहत आहोत आणि इतर देशांकडून जे शिकलो त्यातून हे स्पष्ट होत आहे की, मुलांना या विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता आहे परंतु बहुतेक मुलांमध्ये अतिशय सौम्य आजार दिसतील.

उपचारासाठी रेमडेसिविर, एचसीक्यू किंवा आयव्हरमेक्टिन सारख्या औषधांचा वापर करण्याबाबत त्या म्हणाल्या की, आतापर्यंत असे कोणतेही पुरावे समोर आले नाहीत, जे सिद्ध करतील की एचसीक्यू किंवा आयव्हरमेक्टिनचा व्हायरसने संक्रमित लोकांमध्ये मृत्यू किंवा संसर्ग कमी करण्यात काही भूमिका आहे.

ताज्या बातम्या

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...

तुमच्या घरात कोरोनाबाधित व्यक्ती आहे? तर या टीप्स करा, कोरोनापासून रहा सुरक्षीत

माय महाराष्ट्र न्यूज:काही दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याचे पहायला मिळत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावापासून आपला बचाव कसा करावा, तसेच जर आपल्या घरात एखाद्या...
error: Content is protected !!