Tuesday, January 18, 2022

नगर जिल्ह्यातील चार वर्षापूर्वी मुलीस फुस लावून पळवून नेणार्‍या आरोपीला अटक

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:चार वर्षापूर्वी अल्पवयीन मुलीस फुस लावून पळवून नेणार्‍या आरोपीला अटक करण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाला यश आले आहे. भाऊसाहेब ऊर्फ मनोज देवराम हंडाळ (रा. हंडाळवाडी ता. पाथर्डी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पिडीत अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले आहे.तपासकामी त्यांना पाथर्डी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. मनोज हंडाळ याने एप्रिल 2017 मध्ये एका अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेले होते. याप्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

सदरचा गुन्हा तपासकामी एप्रिल 2018 मध्ये अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाकडे वर्ग करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार एस. बी. कांबळे करत होते.पिडीत मुलगी व मनोज हंडाळ नगरमार्गे पुणे येथे जात असल्याची माहिती कांबळे यांना मिळाली होती.

सहायक निरीक्षक सतिष गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार कांबळे, अर्चना काळे, मोनाली घुटे यांच्या पथकाने आरोपी हंडाळसह अल्पवयीन मुलीला पुणे बस स्थानकावर ताब्यात घेतले. हंडाळ याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पाथर्डी पोलीस करीत आहे.

ताज्या बातम्या

भेंड्यात बिबट्याकडून शेळीचा फडशा

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर सुरु झाला असून सोमवारी सांयकाळी 7 वाजेच्या सुमारास बिबट्याने भेंडा-देवगाव रस्त्यावरील श्रीकांत भिमराज शिंदे यांचे वस्तीवर अंगणात बांधलेल्या...

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...
error: Content is protected !!