Thursday, January 20, 2022

राज्यमंत्री आदिती तटकरे यांचा अहमदनगर जिल्हा दौ-यावर

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: राज्याच्या उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्‍पादन, क्रीडा व युवक कल्‍याण, राजशिष्‍टाचार, माहिती व जनसंपर्क, विधि व न्‍याय राज्यमंत्री कु. आदिती तटकरे या नगर जिल्हा दौर्‍यावर येत असून त्यांच्या दौर्‍याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

 शुक्रवार, दिनांक 27 ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता पुणेहून अहमदनगरकडे प्रयाण. रात्री 8 वाजता शासकीय विश्रामगृह, अहमदनगर येथे आगमन व मुक्काम.  शनिवार दि. 28 ऑगस्‍ट रोजी सकाळी 10 वाजता शासकीय विश्रामगृह अहमदनगर येथुन शासकीय वाहनाने राहुरीकडे प्रयाण.

सकाळी 11 वाजता मुथा प्‍लॉट, राहुरी येथे आगमन व राहुरी शहर पाणीपुरवठा योजनेच्‍या कामांच्या भूमिपुजनास उपस्थिती. सकाळी 11.15 वाजता मुथा प्‍लॉट येथुन शासकीय वाहनाने व्‍यंकटेश लॉन्‍स, स्‍टेशन रोडकडे प्रयाण. सकाळी 11.30 वाजता व्‍यंकटेश लॉन्‍स येथे आगमन व राहुरी शहर पाणीपुरवठा योजनेच्‍या मुख्‍य समारंभास उपस्थिती.

दुपारी 1 वाजता राखीव. दुपारी 2 वाजता राहुरी येथुन महात्‍मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरीकडे प्रयाण. दुपारी 2.10 वाजता महात्‍मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे प्रक्षेत्र भेट. दुपारी 3.30 वाजता महात्‍मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथुन अहमदनगरकडे प्रयाण. दुपारी 4.30 वाजता मराठा चेंबर ऑफ कॉमर्स,

एमसीसीआयए बिल्‍डींग, प्‍लॉट नं.86, एमआयडीसी, अहमदनगर येथे आगमन व अहमदनगर जिल्‍ह्यातील औद्योगिक सुविधा व अडचणीविषयी बैठकीस उपस्थिती. सायंकाळी 5.45 वाजता अहमदनगर एमआयडीसी येथुन सावेडीकडे प्रयाण. सायंकाळी 6 वाजता सावेडी, अहमदनगर शहर येथे आगमन व सावेडी येथील

जॉगींग ट्रॅक वरील “नवीन बास्‍केट बॉल कोर्टचे” उद्घाटन. सायंकाळी 6.30 वाजता सावेडी येथुन ऐतिहासिक वास्‍तू संग्रहालयाकडे प्रयाण. सायंकाळी 6.40 वाजता ऐतिहा‍सिक वास्‍तू संग्रहालय येथे आगमन व टच फाऊंडेशन आयोजित “रिव्‍हीलींग दी टूथ आयडेंटिटि ऑफ अहमदनगर” या विशेष दालनाचे उद्धाटन समारंभास उपस्थिती.

सायंकाळी 7.30 वाजता ऐतिहासिक वास्‍तू संग्रहालय येथुन सारसनगरकडे प्रयाण. सायंकाळी 7.40 वाजता सारस नगर येथे आगमन व गवळी समाजाचे आराध्‍य दैवत सिधाजी आप्‍पा मंदिरास भेट. सायंकाळी 8 वाजता सारसनगर येथुन शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. सायंकाळी 8.10 वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव.

रविवार दि. 29 ऑगस्‍ट रोजी शासकीय विश्रामगृह, अहमदनगर येथून जिल्‍हा क्रीडा संकुलाकडे प्रयाण. सकाळी 10.40 वाजता जिल्‍हा क्रीडा संकुल येथे आगमन व जिल्‍हा क्रीडा संकुलाची पाहणी. सकाळी 11.30 वाजता जिल्‍हा क्रीडा संकुल अहमदनगर येथुन राळेगणसिध्‍दी, ता. पारनेरकडे प्रयाण.

दुपारी 12.30 वाजता राळेगणसिध्‍दी येथे आगमन व ज्‍येष्‍ठ समाजसेवक अण्‍णा हजारे यांची सदिच्‍छा भेट. दुपारी 1 वाजता राळेगणसिध्‍दी येथून खडकवाडी, ता. पारनेर, जि. अहमदनगरकडे प्रयाण. दुपारी 2 वाजता खडकवाडी, ता. पारनेर, जि. अहमदनगर येथे आगमन व राखीव. सायंकाळी 4 वाजता खडकवाडी, ता. पारनेर येथे सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत मंजुर

 रस्‍त्‍यांच्‍या भूमिपुजनास उपस्थिती. सायंकाळी 5 वाजता खडकवाडी, ता. पारनेर येथुन शासकीय वाहनाने सुतारवाडी, ता. रोहा, जि. रायगडकडे प्रयाण

ताज्या बातम्या

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...

तुमच्या घरात कोरोनाबाधित व्यक्ती आहे? तर या टीप्स करा, कोरोनापासून रहा सुरक्षीत

माय महाराष्ट्र न्यूज:काही दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याचे पहायला मिळत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावापासून आपला बचाव कसा करावा, तसेच जर आपल्या घरात एखाद्या...
error: Content is protected !!