Thursday, January 20, 2022

नगर जिल्ह्यातील शेतकरी संतापले सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या दारात टोमॅटो आणून टाकू

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात अचानकपणे टोमॅटोचे भाव कोसळल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. करोनाच्या कठीण काळातही मोठे कष्ट आणि खर्च करून पिकविलेला माल भाव नसल्याने रस्त्यावर ओतण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. यामध्ये सरकारने तातडीने लक्ष घालून उपाय करावेत, अन्यथा सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या दारात टोमॅटो आणून टाकू, असा इशारा शेतकरी नेते डॉ. अजित नवले यांनी दिला आहे.

गेल्या काही दिवसांपासून अचानकपणे राज्यात टोमॅटोचे भाव कोसळले आहेत. नाशिक, अहमदनगर, पुणे, औरंगाबाद या भागात टोमॅटोचे जादा उत्पादन होते. सर्वच ठिकाणी आवक वाढली असून भाव मात्र कोसळले आहेत. टोमॅटोच्या २० किलो कॅरेट्ला ६० ते १०० रुपये दर म्हणजे प्रति किलो ३ ते ५ रुपये भाव मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे. टोमॅटो लागवडीसाठी आलेला खर्च तसेचवाहतूक खर्चही निघत नाही.

यावर्षी टोमॅटो उत्पादक भागात पावसाने खंड दिला होता. याकाळात पावसाने होणारे नुकसान टळून टोमॅटोचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाल्याचे सांगण्यात येते. तर दुसरीकडे देशांतर्गत टोमॅटोची मागणी घटली आहे. गेल्या तीन वर्षांपासून पाकिस्तान सीमा बंद असल्याने आखाती देशात टोमॅटोच्या निर्यातीला मर्यादा आल्या आहेत. यासर्वांचा परिणाम होऊन भाव कोसळल्याचे सांगण्यात येते.

यासंबंधी बोलताना किसान सभेचे सरचिटणीस डॉ. अजित नवले म्हणाले, ‘अचानक भाव कोसळल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. मात्र, सरकार आणि विरोधक दुसऱ्याच गोंधळात व्यग्र आहेत. त्यांनी तो गोंधळ थांबवून ताबडतोब या प्रश्नात लक्ष घालून शेतकऱ्यांना दिलासा दिला पाहिजे. कोल्ड स्टोअरेज, प्रक्रिया उद्योग यांना चालना देऊन टोमॅटोला

बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे धोरण घेतले पाहिजे. लाखो रुपये खर्चून पिकविलेला टोमॅटो फेकून देण्याची वेळ आली आहे.

ताज्या बातम्या

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...

तुमच्या घरात कोरोनाबाधित व्यक्ती आहे? तर या टीप्स करा, कोरोनापासून रहा सुरक्षीत

माय महाराष्ट्र न्यूज:काही दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याचे पहायला मिळत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावापासून आपला बचाव कसा करावा, तसेच जर आपल्या घरात एखाद्या...
error: Content is protected !!