Tuesday, January 18, 2022

शिरापूरच्या शेतकऱ्यांने सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांकडे मागितली गांजा लावण्याची परवानगी

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

सोलापूर

सोलापूर जिल्ह्यातील शिरापूर येथील शेतकरी अनिल आबाजी पाटील या शेतकऱ्यांने सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांकडे दोन एकर गांजा लावणेची परवानगी मागणी केली आहे.

सध्या सामाजिक माध्यमातून अनिल पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना उद्देशून लिहिलेले पत्र व्हायरल झालेले आहे.
त्या पत्रात त्यांनी म्हंटले आहे की,माझी शिरापूर ता. मोहोळ येथे स्वताच्या मालकीची जमीन जमीन आहे.मी शेतकरी असून कोणतेही पिक केले तरी त्याला शासनाचा हमी भाव नसल्यामुळे शेती तोट्यात करावी लागत आहे. शेतीमालाला कवीडमोल भाव मिळत असल्यामुळे शेती करणे कठीण झाले आहे. मशागतीसाठी केलेला खर्च देखील मिळत नाही. तसेच एखाद्या साखर कारखान्याला ऊस गाळपासाठी दिला असता त्याचे देखील बिल लवकर मिळत नाही. त्यामुळे गांजाला चांगला भाव असल्यामुळे मला माझ्या
गट नं. १८१/४ असून या क्षेत्रात दोन एकर गांजा लावण्यासाठी प्रशासनाने दि. १५/०९/२०२१ पर्यंत लेखी परवानगी दयावी अन्यथा मी दि. १६/०९/२०२१ या दिवशी आपल्या प्रशासनाकडून परवानगी मिळाली असे गृहित धरुन मी लागवड सुरु करणार आहे व माझ्यावर गुन्हा दाखल झाला तर त्यास आपले प्रशासन जबाबदार राहील.

ताज्या बातम्या

भेंड्यात बिबट्याकडून शेळीचा फडशा

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर सुरु झाला असून सोमवारी सांयकाळी 7 वाजेच्या सुमारास बिबट्याने भेंडा-देवगाव रस्त्यावरील श्रीकांत भिमराज शिंदे यांचे वस्तीवर अंगणात बांधलेल्या...

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...
error: Content is protected !!