Thursday, January 20, 2022

जाणून घ्या नगर जिल्ह्यातील धरणाची पाणीपातळी

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील पाऊस सरासरीपेक्षा कमी आहे. यामुळे ऑगस्ट महिण्यात पुर्ण क्षमतेने भरणारे जिल्ह्यातील धरणांपैकी एकही धरण पुर्ण क्षमतेने भरू शकले नाही .

तरी धरणाच्या लाभक्षेत्रात अधूनमधून पडणार्‍या पावसामुळे धरणातील पाणी पातळीत  वाढ होत आहे. आज गुरुवारी सकाळी 6 वाजेपर्यंत मुळा धरण 72.75 टक्के, भंडारदरा 88.19 टक्के, निळवंडे 71.22 टक्के, आढळा 52.64 टक्के असा पाणीसाठा झाला आहे.

राज्यातील इतर भागात समाधानकारक पाऊस झाला असली तरी अहमदनगर जिल्ह्यातील पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा अत्यल्प आहे. आतापर्यंत ऑगस्ट महिण्यात जिल्ह्यातील धरणे पुर्ण क्षमतेने भरलेली असतात. मात्र यावर्षी ऑगस्ट महिना संपत आला तरी एकही धरण पुर्ण क्षमतेने भरलेले नाही. यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

जिल्ह्यातील धरण लाभक्षेत्रात अधून मधून पडणार्‍या पावसामुळे धरणातील पाणी पातळी हळू हळू वाढत आहे. गेल्या चोवीस तासात धरणाच्या लाभक्षेत्रातील भंडारदरा 4 मी.मी., रतनवाडी 7 मी. मी., वाकी 2 मी.मी. अशी पावसाची नोंद झाली आहे. मात्र घाटघर, पांजरे, निळवंडे, आढळा, अकोले या भागात पाऊस झाला नाही.

गुरुवार दि. 26 ऑगस्ट 2021 च्या सकाळी 6 वाजेपर्यंत भंडारदरा धरणसाठा 9735 टीएमसी (88.19 टक्के) झाला आहे. निळवंडे धरणातील पाणीसाठा 5931 टीएमसी (71.22 टक्के) झाला आहे. आढळा धरणात 558 टीएमसी (52.64 टक्के) झाला आहे.

पाणलोट क्षेत्रात अधून मधून पडणार्‍या पावसामुळे मुळा धरणात मुळा नदी पात्रातून 631 क्युसेकने पाण्याची आवक सुरू आहे. यामुळे मुळा धरणाचा पाणीसाठा 18917 टीएमसी (72.75 टक्के) झाला आहे. मात्र धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील कोतूळ व मुळानगर येथे पावसाने उघडीप दिली आहे.

ताज्या बातम्या

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...

तुमच्या घरात कोरोनाबाधित व्यक्ती आहे? तर या टीप्स करा, कोरोनापासून रहा सुरक्षीत

माय महाराष्ट्र न्यूज:काही दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याचे पहायला मिळत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावापासून आपला बचाव कसा करावा, तसेच जर आपल्या घरात एखाद्या...
error: Content is protected !!