Saturday, January 22, 2022

पुढील 5 दिवस राज्यात काय असेल पावसाची स्थिती? जाणून घ्या

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात पावसाचा जोर कमी होत असताना पुढील 5 दिवसांसाठी हवामान खात्याने महाराष्ट्रभरातील पावसाची स्थिती काय असेल, याचा अंदाज वर्तवला आहे. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये

विजेच्या कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता असल्याचे सांगण्यात आले आहे. तर राज्यात इतर काही ठिकाणी मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज आहे. 26-30 ऑगस्ट दरम्यान राज्यातील पावसाची स्थिती हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

आज, 26 ऑगस्ट रोजी रत्नागिरी, सातारा, पुणे, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, सागंली जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. तर बीड, उस्मानाबाद, लातूर आणि नांदेड जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 27 ऑगस्ट रोजी पूर्व विदर्भाला यलो अ‌ॅलर्ट जारी करण्यात आला आहे. तर वर्धा, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे.

तसंच या ठिकाणी मेघर्गजनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.28 ऑगस्ट रोजी वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय इतर जिल्ह्यातही हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होऊ शकतो. 29 आणि 30 ऑगस्ट रोजी राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.दरम्यान, यंदा वेळेपूर्वी मान्सून दाखल झाला. या वर्षी सामान्य पावसाचा अंदाज असूनही अतिवृष्टीमुळे राज्यात अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली. दरड, भिंत कोसळणे अशा घटनाही अनेक घडल्या.

काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा बरसण्यास सुरुवात केली आहे.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!