Tuesday, January 18, 2022

सावधान! तुमच्या नावावर कोण मोबाईल सिम घेऊन वापरतोय १० सेकंदात असं पाहा

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: सिम कार्ड घेण्यासाठी आधार कार्ड बंधनकारक करण्यात आहे. अनेकदा काही जण आधार कार्डचा गैरवापर करत दुसऱ्याच्या नावावर सिम कार्ड घेतात. त्या सिम कार्डचा गैरवापर केला जातो. त्याचा मनस्ताप हा आधार कार्डधारकाला भोगावा लागतो.

मात्र तुमच्या आधार कार्डावर किती मोबाईल नंबर लिंक आहेत, हे अवघ्या एका क्लिकवर जाणून घेता येणार आहे. एका व्यक्तीच्या आधारवर तसेच इतर कागदपत्रांवर किती मोबाईल नंबर लिंक आहेत, हे जाणून घेण्यासाठी दूरसंचार विभागाने नवं पोर्टल सुरु केलं आहे.

अशी आहे प्रोसेस………
आपल्या आधारसह किती मोबाईल नंबर लिंक आहेत, हे जाणून घेण्यासाठी http://tafcop.dgtelecom.gov.in या वेबसाईटवर जावं लागेल. वेबसाईटवर गेल्यानंतर मोबाईल नंबर एंटर करावा. त्यानंतर मोबाईलवर एक 6 अंकी ओटीपी येईल.

तो ओटीपी एंटर केल्यानंतर तुमच्या आधारवर खरेदी करण्यात आलेले मोबाईल नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसतील. सध्या ही सुविधा तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यांसाठीच आहे. मात्र या सुविधेचा लाभ सर्वचं घेऊ शकतात, असं या वेबसाईटवर नमूद करण्यात आलं आहे.

आधार कार्डाचा गैरवापर करुन सिम कार्ड घेतले जातात. त्याद्वारे लोकांची फसवणूक केली जाते. मोबाईल युझर्ससह अशा कोणत्याही प्रकारचा मनस्ताप सहन करावा लागू नये तसेच कोणतीही फसवणूक होऊ नये, या उद्देशाने दूरसंचार विभागाने हे नवं पोर्टल सुरु केलंय.

ही वेबसाईट युझर्सच्या मदतीसाठी विकसित करण्यात आली आहे. या पोर्टलच्या मदतीने युझर्स त्याच्या नावे किती मोबाईल कनेक्शन सुरु आहेत, हे जाणून घेता येऊ शकतं. तसेच कोणतं एखादं जास्तीचं कनेक्शन असेल, तर ते रेग्युलरही करता येऊ शकतं.

एखाद्या व्यक्तीच्या नावावर 9 पेक्षा अधिक मोबाईल सिम कार्ड असतील, तर त्या व्यक्तीला एसएमएसद्वारे माहिती दिली जाते”, असं दूरसंचार विभागाने आपल्या निवेदनात स्पष्ट केलंय. तुमच्या नकळत जर अधिक मोबाईल सिम घेतले गेले असतील, तर त्याबाबतची तक्रारही या वेबसाईटद्वारे करता येते.

ताज्या बातम्या

भेंड्यात बिबट्याकडून शेळीचा फडशा

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर सुरु झाला असून सोमवारी सांयकाळी 7 वाजेच्या सुमारास बिबट्याने भेंडा-देवगाव रस्त्यावरील श्रीकांत भिमराज शिंदे यांचे वस्तीवर अंगणात बांधलेल्या...

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...
error: Content is protected !!