Monday, January 17, 2022

डॉ. तनपुरे’ च्या कामगारांचे चौथ्या दिवशीही आंदोलन सुरुच

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्याची कामधेनु असलेल्या डॉ. बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या साखर कामगारांनी थकित वेतन मिळावे या मागणीसाठी आंदोलन सुरु केले. आज आंदोलनाचा चौथा दिवस होता.

एक दिवस आगोदर कामगारांनी अर्धनग्न होत आंदोलनात भाग घेत अनेकांचे लक्ष वेधले होते. कारखान्याचे सर्वेसर्वा डॉ सुजय विखे पाटील यांनी संचालक मंडळा समवेत बैठक घेऊन माहिती घेतली, मात्र कोणताही ठोस निर्णय झाला नसल्याने कामगारांनी आंदोलन अधिक तीव्र करण्याची भूमिका घेतली असून निर्णयावर अद्यापही कामगार ठाम आहेत.

संचालक मंडळाने अद्याप कोणतीही भूमिका घेतलेली नसल्याने आंदोलन चिघळण्याच्या मार्गावर आहे. गेल्या पाच वर्षातील सुमारे २५ कोटी ३६ लाख रुपयांचे थकीत वेतन मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही अशी भूमिका आंदोलक कामगारांनी घेतलेली आहे. त्यातच खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी

तसेच कारखान्याचे अध्यक्ष नामदेव ढोकणे, उपाध्यक्ष दत्तात्रय ढुस, कार्यकारी संचालक भाऊसाहेब सरोदे व संचालकांनी आंदोलनाकडे डोळेझाक करत पाठ फिरवली होती. त्यामुळे कामगारांमध्ये चीड निर्माण झाली. वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलन करण्याचा निर्णय आंदोलन सुरू करण्यापूर्वीच कामगारांनी घेतलेला होता. त्याचा भाग म्हणून बुधवारी अर्धनग्न होत आंदोलन केले.

कारखान्याच्या इतिहासात कामगारांनी अर्धनग्न होण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे.आंदोलनाचा चौथा दिवस संपुष्टात येत असताना कामगारांमध्ये असंतोषाचा भडका उडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यातच आत्मदहनाचाही इशारा देण्यात आलेला असल्याने कारखाना व्यवस्थापनाला आंदोलक कामगारांकडे डोळेझाक करणे महागात पडू शकते असे सांगितले जात आहे.

कामगार नेते इंद्रभान पेरणे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरूच असून कोणत्याही परिस्थितीत कोणाच्याही दबावाला बळी न पडण्याचा निर्णय घेण्यात आलेला असल्याने आंदोलन आता कोणत्या मार्गाने जाणार याविषयी तर्कवितर्क लढविले जात आहेत. दरम्यान आज आमदार लहु कानडे, देवळाली प्रवराचे नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी भेट दिली.

कारखान्याचे अध्यक्ष नामदेव ढोकणे, संचालक श्यामराव निमसे, सुरसिंग पवार, महेश पाटील, विजय डौले यांनीही भेट देऊन कामगारांशी चर्चा केली. आज उपोषणकर्ते राजू इग्नाती, सांगळे यांची प्रकृती ढासळल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तहसीलदार फश्योउद्दीन शेख

यांनी कामगारांची भेट घेत सहाय्यक कामगार आयुक्त व भविष्य निर्वाह निधी आयुक्त यांच्याशी संपर्क साधत कामगारांच्या मागण्या संदर्भात चर्चा केली.

ताज्या बातम्या

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...

या आमदाराची जीभ घसरली! रस्ते कंगना राणौतच्या गालापेक्षा चांगले करणार

माय महाराष्ट्र न्यूज:अभिनेत्री कंगणा रणौतविषयी वादग्रस्त वक्तव्य करून काँग्रेस आमदार डॉ. इरफान अन्सारी वादात सापडण्याची शक्यता आहे. जामताडामधील रस्ते कंगना रणौतच्या गालापेक्षाही चिकने बनवले...
error: Content is protected !!