Monday, January 17, 2022

नगर ब्रेकींग:जवानांने फेसबुकवर मैत्री करून लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अलिकडच्या काळात अकोले तालुक्यातील एकामागून एक घटनांनीही या गोष्टीवर मोहोर उमटविली आहे. गेल्या पंधरवड्यात कळसच्या एका तरुणाचा याच तंत्रज्ञानाच्या आडून बळी गेला. त्याच्या वेदनेतून अकोलेकर सावरत असताना

आता सैन्यदलातील जवानाने समाज माध्यमातून जवळीक साधत लग्नाचे अमिष दाखवून तरुणीवर वारंवार अत्याचार करुन भलतीशीच संसार थाटल्याचे वृत्त येवून धडकले आहे. त्यामुळे एकामागून एक धक्कादायक घटनांतून निसर्ग सौंदर्याने फुललेले अकोले पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेल्या अकोले तालुक्यातील कोहडी येथील किरण दिघे या जवानाने फेसबुक या समाज माध्यमाद्वारे तालुक्यातील एका तरुणीशी ओळख करुन व नंतर तिला लग्नाचे अमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यासाठी त्याने तरुणीच्या कुटुंबियांचाही विश्वास संपादन केला

त्याचा गैरफायदा घेवून त्या तरुणीला पर्यटनाच्या नावाने जिल्ह्यात विविध ठिकाणी नेवून शारीरिक संबंध केले. तरुणीने लग्नाचा तगादा लावल्यानंतर त्याने लग्न करण्यास नकार देत त्या तरुणीशी नाते तोडले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्या तरुणीने अकोले पोलीस ठाण्यात धाव घेवून वरील आशयाची फिर्याद दाखल केली.

त्यानुसार संबंधित जवानावर दीड वर्षांपूर्वी अत्याचाराचा गुन्हाही दाखल झाला होता.सदरचे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. मात्र त्या दरम्यानच किरण दिघे या जवानाने दुसर्‍या मुलीशी विवाह करुन आपला संसार थाटला आहे. याबाबतची फिर्याद घेवून पीडित तरुणी वारंवार अकोले पोलिसांकडेही गेली, मात्र कायदेशीर दृष्टीकोनातून

संबंधित जवानाला लग्न करण्यापासून रोखता येत नसल्याने अकोले पोलिसांकडून त्या तरुणीची समजूत काढण्याचाही प्रयत्न झाला. त्या तरुणीने दाखल केलेल्या तक्रारीनुसार न्यायालयात सुनावणी सुरु असून लवकर न्याय मिळेल असेही पोलिसांकडून तिला सांगण्यात आले. मात्र जोपर्यंत न्यायालयाचा निकाल होत नाही

तोपर्यंत त्याचे लग्न होवू नये अशी त्या तरुणीची मागणी आहे. मात्र तिची मागणी पूर्ण करण्यास पोलीस असमर्थ असल्याने तिने एका राजकीय पक्षाकडे धाव घेतली.या अत्याचार प्रकरणाबाबत भारतीय ट्रायबल पार्टीच्या अहमदनगर जिल्हा प्रभारी डॉली डगळे यांनी वरीलप्रमाणे घटनाक्रम सांगणारे पत्रक प्रसिद्धीला दिले आहे.

त्यानुसार त्यांनी पीडित तरुणीला जलद न्याय मिळावा यासाठी सदरचा खटला जलदगती न्यायालयात वर्ग करावा, तसेच जोपर्यंत या खटल्याचा निकाल समोर येत नाही तोपर्यंत संबंधित आरोपीचे लग्न रोखावे. कारण त्याने पीडित तरुणीशी लग्नाचे अमिष दाखवूनच संबंध ठेवले होते.

ताज्या बातम्या

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...

या आमदाराची जीभ घसरली! रस्ते कंगना राणौतच्या गालापेक्षा चांगले करणार

माय महाराष्ट्र न्यूज:अभिनेत्री कंगणा रणौतविषयी वादग्रस्त वक्तव्य करून काँग्रेस आमदार डॉ. इरफान अन्सारी वादात सापडण्याची शक्यता आहे. जामताडामधील रस्ते कंगना रणौतच्या गालापेक्षाही चिकने बनवले...
error: Content is protected !!