Saturday, January 22, 2022

हे आहे आनंदी सेक्सलाईफचे रहस्य ?

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

 

माय महाराष्ट्र न्यूज:आनंदी सहजीवनाच्या अनेक रहस्यांपैकी एक रहस्य म्हणजे रॉकिंग सेक्स लाईफ. हा आनंदी सहजीवनाचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. त्यामुळे असे म्हटले जाते की आनंददायी सेक्स लाईफ तुम्हाला दीर्घ काळापर्यंत एकमेकांशी बांधून ठेवते. तसंच आनंदी सहजीवन आणि आरोग्यदायी जीवनासाठी सेक्स लाईफ महत्त्वाचे कार्य करते. सेक्स करण्याचे ’5′ आरोग्यदायी फायदे !

 

पण तुमच्या मते आनंदी सेक्स लाईफचे रहस्य काय आहे? काही लोकांना सेक्सचा कालावधी तर काहींना सेक्सचे प्रमाण (किती वेळा सेक्स करता) हे महत्त्वाचे वाटते. म्हणजेच आनंदी सेक्सलाईफ हे तुम्ही किती वेळ सेक्स करता आणि किती वेळा शारीरिकरीत्या जवळ येता यावर अवलंबून आहे.

पण तुमच्या मते आनंदी सेक्स लाईफचे रहस्य काय आहे? काही लोकांना सेक्सचा कालावधी तर काहींना सेक्सचे प्रमाण (किती वेळा सेक्स करता) हे महत्त्वाचे वाटते. म्हणजेच आनंदी सेक्सलाईफ हे तुम्ही किती वेळ सेक्स करता आणि किती वेळा शारीरिकरीत्या जवळ येता यावर अवलंबून आहे.

 

डॉ. कोठारी यांच्या सल्ल्यानुसार सेक्स ही काही स्पर्धा नाही की त्याचे प्रमाण मोजले जाईल. खरंतर दोघांनी अनुभवलेल्या सुखद क्षणांत आनंद सामावलेला आहे. म्हणून त्याचा कालावधी किंवा प्रमाण याने काही फरक पडत नाही. त्याचबरोबर अधिक वेळा सेक्स करणं हा काही तुमच्या शारीरिक क्षमतेचा, आरोग्याचा किंवा जोम, उत्साहाचा संकेत नाही.

तुमचे सेक्स करण्याचे प्रमाण अधिक असेल पण तुमच्या पार्टनरला त्याचा आनंद घेता येत नसेल किंवा ते एन्जॉय करता येत नसेल तर तुमचे सेक्सलाईफ आनंदी होऊ शकत नाही. आनंदी सेक्सलाईफचा संबंध नात्यातील ओढ, प्रेम, जिव्हाळा,आकर्षण याच्याशी आहे. तुम्ही सेक्स किती वेळा करता त्यापेक्षा कसे करता यावर सेक्सचा आनंद अवलंबून असतो. दोघांना त्यातून किती आनंद, सुख मिळते आणि त्यातून तुम्ही किती समाधानी होता हे अधिक महत्त्वाचे आहे.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!