Tuesday, January 18, 2022

लोकप्रतिनिधीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करावी वाटते अन महसूलमंत्री चकार शब्द काढत नाही

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात होणार्‍या भाजपा कार्यालयावरील हल्ल्याचे मुख्यमंत्री समर्थन करीत असतील तर ही राज्यासाठी धोक्याची घंटा आहे. ही मोगलाई आहे, असे मत भाजपा एन. टी. सेलचे प्रदेश संयोजक माजी आमदार नरेंद्र पवार यांनी व्यक्त केले.

अकोले येथील भाजप कार्यालयात पदवीधर निवडणूक संदर्भात आयोजित बैठकीत पवार बोलत होते. यावेळी धुळे येथील आदर्श शिक्षण संस्थेचे अध्यक्ष धनराज विसपुते, भाजपचे तालुकाध्यक्ष सिताराम भांगरे, सोशल मीडिया जिल्हा संयोजक भाऊसाहेब वाकचौरे, सरचिटणीस मच्छिंद्र मंडलिक, युवा अध्यक्ष राहुल देशमुख, अमोल येवले, प्रसन्न धोंगडे आदी उपस्थित होते.

माजी आमदार पवार म्हणाले की, राज्यातील आघाडी सरकार जनमताचा अनादर करीत सत्तेवर आले असून मुख्यमंत्री पदावरच्या व्यक्तीला स्वातंत्र्य दिनाची माहिती नसेल तर अशा व्यक्तीने महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे.

जर भाजपा कार्यालयावर कोणी हल्ला केला तर त्यास जशास तसे उत्तर देण्याची क्षमता भाजपा कार्यकर्त्यांत आहे. भाजपा हा विचारांचा पक्ष आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय देणारा पक्ष आहे.महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या जिल्ह्यात लोकप्रतिनिधीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करावी वाटते

अन महसूलमंत्री चकार शब्द काढत नाही ही घटना निषेधार्ह आहे. तर पदवीधर मतदारसंघाचे आमदार सुधीर तांबे हे शिक्षक, पदवीधर, बेरोजगार यांचे प्रश्न सोडविण्यास अपयशी ठरले आहेत, असाही आरोप श्री. पवार यांनी केला आहे.

ताज्या बातम्या

भेंड्यात बिबट्याकडून शेळीचा फडशा

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर सुरु झाला असून सोमवारी सांयकाळी 7 वाजेच्या सुमारास बिबट्याने भेंडा-देवगाव रस्त्यावरील श्रीकांत भिमराज शिंदे यांचे वस्तीवर अंगणात बांधलेल्या...

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...
error: Content is protected !!