Thursday, January 20, 2022

आ. राधाकृष्ण विखेंचा माजी आ. मुरकुटेंना सवाल:तुम्ही तुमचा डबा नेमके कोणाला जोडायचा

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:तुम्ही तुमचा डबा नेमके कोणाला जोडायचा हे ठरवा‘ आम्हाला जोडला तर फायदाच होईल, अशी कोपरखळी आमदार राधाकृष्ण विखे यांनी माजी आमदार भानुदास मुरकुटे यांना मारली. त्याला मुरकुटे यांनीही त्यांच्या खास शैलीत उत्तर दिले.जे इंजिन पॉवरफुल्ल असेल त्यालाच आम्ही आमचा डबा जोडणार’ असे मुरकुटे म्हणताच

उपस्थितांमधून हश्याचे फवारे उडाले.राजकारणात कोणीही कुणाचा कायमचा मित्र अन् शत्रू नसतो. विधानसभा निवडणुकीत मैत्री तर जिल्हा बँक निवडणुकीनंतर एकमेकांचे विरोधक झालेले माजी आमदार भानुदास मुरकुटे व आ. राधाकृष्ण विखे पाटील दोन दिवसांपूर्वी श्रीरामपूर

तालुक्यातील एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एका व्यासपीठावर आले. आ. विखे श्रीरामपूरच्या दौर्‍यावर आले की येथील राजकारणावर ते हमखास बोलणार. त्यात हजर जबाबी असलेले व कधी मित्र तर कधी विरोधकांची भूमिका बजावणारे माजी आमदार भानुदास मुरकुटे शांत कसे बसणार?

विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने जुळून आलेल्या राजकीय समिकरणात आ. विखे व माजी आ. मुरकुटे यांची युती झाली होती. त्यानंतर अनेक कार्यक्रमात ते एकत्रित दिसत होते. यापुढील सर्व निवडणुका एकत्रित लढवण्याचेही त्यांनी जाहीर केले होते.

मात्र जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत माजी आमदार मुरकुटे हे ना.बाळासाहेब थोरातांच्या सहकार्याने बिनविरोध संचालक झाले. त्यामुळे दोघांची सहमती तुटली.या वितुष्टानंतर परवाही दोन्ही नेतेमंडळी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एका व्यासपीठावर आले.

ताज्या बातम्या

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...

तुमच्या घरात कोरोनाबाधित व्यक्ती आहे? तर या टीप्स करा, कोरोनापासून रहा सुरक्षीत

माय महाराष्ट्र न्यूज:काही दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याचे पहायला मिळत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावापासून आपला बचाव कसा करावा, तसेच जर आपल्या घरात एखाद्या...
error: Content is protected !!