Tuesday, January 18, 2022

अण्णा हजारे म्हणतात, जनताच कुंभकर्णासारखी झोपलीय

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:आता कोठे गेले अण्णा, झोपले की काय? असा सवाल अधूनमधून सोशल मीडियातून केला जातो. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आंदोलन करावे, अशी अपेक्षा ठेवून हा प्रश्न केला जातो. तर अनेकदा त्यामागे राजकीय टीकाही असते.

अशा परिस्थितीत आता हजारे यांनीही जनतेवरच झोपल्याचा आरोप केला आहे. ‘जनताच कुंभकर्णासारखी झोपली आहे, त्यामुळे सरकार त्यांना हवे ते करून घेत आहे. जनता जागी झाल्याशिवाय हे प्रश्न सुटणार नाहीत,’ असं हजारे यांनी म्हटलं आहे. आपण मात्र जागेच असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितलं.

देश बचाव जनआंदोलन समितीनं गेल्या आठवड्यात पुण्यात पत्रकार परिषद घेऊन सध्याच्या विविध प्रश्नांवर हजारे यांनी भूमिका मांडावी, आंदोलनासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी केली होती. अन्यथा राळेगणसिद्धी येथे आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला होता.

त्यामुळं हजारे यांच्याकडून समितीला चर्चेला येण्याची निमंत्रण देण्यात आलं होतं. त्यानुसार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी राळेगणसिद्धीत येऊन हजारे यांची भेट घेतली. त्यांच्याशी चर्चा करताना हजारे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

हजारे म्हणाले, ‘माझं वय आता ८४ वर्षे आहे. मी कधीपर्यंत लढू? देश बचाव जनआंदोलन समिती युवकांनी स्थापन केली. यासाठी मी त्यांचे अभिनंदन करतो. तुम्ही लढा उभा करा, मी तुमच्यासोबत अवश्य येईल. आतापर्यंत आपण आंदोलनं करून लोकहिताचे कायदे मंजूर करून घेतले. मात्र, आता सरकारला वाटेल ते कायदे बहुमताच्या जोरावर मंजूर करण्यात येत आहेत.

मागणी नसताना अनेक कायदे करण्यात येत आहेत. जनताच कुंभकर्णासारखी झोपली आहे. त्यामुळं सरकारलाही हे करणं शक्य होत आहे. जनतेनं आवाज उठवून सरकार बदलण्याची ताकद उभी केली पाहिजे, तेव्हाच सरकार झुकेल आणि जाचक कायदे रद्द केले जातील,’ असंही हजारे म्हणाले. यावर कार्यकर्त्यांनी

हजारे यांना पूर्वीच्या आंदोलनांची आठवण करून दिली. ‘तुमच्या शब्दाला दिल्लीत वजन आहे. तुम्ही दिल्लीला हलवू शकता, त्यामुळं आम्ही तुमच्याकडं आलो आहोत,’ असं कार्यकर्ते हजारे यांना म्हणाले.

ताज्या बातम्या

भेंड्यात बिबट्याकडून शेळीचा फडशा

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर सुरु झाला असून सोमवारी सांयकाळी 7 वाजेच्या सुमारास बिबट्याने भेंडा-देवगाव रस्त्यावरील श्रीकांत भिमराज शिंदे यांचे वस्तीवर अंगणात बांधलेल्या...

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...
error: Content is protected !!