माय महाराष्ट्र न्यूज:-मुळा लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांची मागणी विचारात घेवून खा.डॉ सुजय विखे पाटील यांच्या सूचनेवरून उजव्या कालव्यांना उन्हाळी आवर्तन सोडण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने
घेतला असून दि.१मार्च ते १५एप्रिल २०२३ पर्यत या आवर्तनाचा कालावधी असणार आहे.सध्या लाभक्षेत्रात शेतकऱ्यांनी ऊस कांदा गहू मका तसेच चारा पीकांची लागवड केली आहे.उन्हाची तीव्रता
वाढत चालल्याने पाण्याची पातळी घटत आहे.त्यामुळे मुळाचे उन्हाळी आवर्तन तातडीने सुरू करावे आशी मागणी शेतकऱ्यानी खा.डॉ सुजय विखे पाटील यांची भेट घेवून केली होती.पाण्याची तीव्रता लक्षात घेवून विभागाने
आवर्तनाचे नियोजन करावे आशा सूचना खा.विखे पाटील यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या होत्या.उन्हाळी आवर्तनाचे नियोजन विभागाने केले असून दि.१मार्च ते १५ एप्रिल २०२३ या कालावधीत करण्यात आले असून,
लाभक्षेत्रातील अंदाजे ३०हजार हेक्टर क्षेत्राला या आवर्तनाचा लाभ होणार असून ४५ दिवस हे आवर्तन सुरू राहाणार असल्याने राहुरी नेवासा शेवगाव पाथर्डी या तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.