Friday, March 24, 2023

उद्यापासून 10वीची परीक्षा; सेंटरला जाण्याआधी ‘या’ गाईडलाईन्स वाचाच

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकेंडरी अँड हायर सेकेंडरी एजुकेशनतर्फे घेण्यात येणारी दहावीची परीक्षा (राज्यात मंगळवारपासून म्हणजेच 02 मार्चपासून सुरु होणार आहे.

यंदा बोर्डाची परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं होणार आहे. त्यामुळे सर्वच विद्यार्थ्यांना परीक्षेची उत्सुकता लागली आहे. परीक्षेसाठी बोर्डाकडून विद्यार्थ्यांसाठी काही नियम जारी करण्यात आले आहेत.

या नियमांचं काटकोरपणे विद्यार्थ्यांना पालन करावं लागणार आहे. चला तर मग जाणून घेऊया बोर्डाकडून जारी करण्यात आलेले नियम.इयत्ता 10वी बोर्डाच्या परीक्षा 02 मार्च 2022 पासून सुरू होतील आणि कोविड-19 सुरक्षा

प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन करून त्या ऑफलाइन पद्धतीने घेतल्या जातील. अधिक तपशील आणि अद्यतनांसाठी अर्जदार अधिकृत वेबसाइट mahahsscboard.in ला भेट देऊ शकतात.उमेदवारांना रिपोर्टिंग वेळेच्या

30 मिनिटे आधी परीक्षा केंद्रावर पोहोचणे आवश्यक आहे.विद्यार्थ्यांना परीक्षा हॉलमध्ये कोणत्याही प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य नेण्यास मनाई आहे. परीक्षा केंद्रात प्रवेश करताना विद्यार्थ्यांची झडती

घेतली जाईल आणि कोणत्याही इलेक्ट्रॉनिक उपकरणाला परवानगी दिली जाणार नाही.परीक्षा केंद्रामध्ये बंदी घालण्यात आलेल्या वस्तूंमध्ये मोबाईल फोन, इलेक्ट्रॉनिक उपकरण, हेडफोन आणि इतर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक गॅझेटचा समावेश आहे.

प्रश्नांची उत्तरे देण्यापूर्वी प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिकेवर दिलेल्या सर्व सूचना वाचण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.परीक्षेपूर्वी शाळांकडे देण्यात येणारे छापील वेळापत्रक अंतिम असणार आहे. त्या वेळापत्रकावरुन खात्री करुन विद्यार्थ्यांनी

परीक्षेस प्रविष्ट व्हावे. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये, असेही शिक्षण विभागामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!