माय महाराष्ट्र न्यूज:आचार्य चाणक्य हे महान अर्थतज्ज्ञ आणि कूटनिती तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. त्यांनी लिहिलेली निती ही चाणक्य निती म्हणून ओळखली जाते. या चाणक्य नितीमध्ये
कोणी कसे वागावे याबाबत विस्तृत मार्गदर्शन आढळते. आज आपण जाणून घेऊ की आचार्य चाणक्य यांनी महिलांनी काय करावे आणि काय करू नये याबाबत चाणक्य नितीमध्ये काय नमूद केले आहे.
आचार्य चाणक्य सांगतात की महिलांनी स्वावलंबी व्हावे. पुरुषांवर अवलंबून राहू नये. ज्या महिला पूर्णपणे पुरुषांवर अवलंबून राहतात त्यांचे नुकसान होते. त्यांच्या सर्वच्या सर्व इच्छा आकांक्षा
तसेच स्वप्न यांची पूर्तता होणे कठीण असते. कारण या महिलांना पुरुषांच्या प्राधान्यक्रमावर अवलंबून राहावे लागते. पूर्णपणे पुरुषांवर अवलंबून असलेल्या महिलांचे महत्त्व हळू हळू मर्यादीत होते किंवा कमी होते.
क्षमता असूनही अशा महिला त्या क्षमतांचा पुरेपूर उपयोग करू शकत नाहीत. स्वतःला आजमावले नसल्यामुळे या महिला नकळत मानसिकदृष्ट्या कमकुवत होण्याचा धोका वाढतो. धनासाठी या महिला पुरुषांवर अवलंबून असतात. यामुळे
वैयक्तिक आयुष्य कसे जगावे याचा निर्णय या महिला स्वतंत्रपणे घेण्यासाठी असमर्थ होत जातातकामुकतेच्या बाबतीतही महिला पुरुषांपेक्षा श्रेष्ठ आहेत. पण स्वतःला कमकुवत समजल्यामुळे महिला कामुकतेच्या
बाबतीतही नकळत मागे पडतात असे आचार्य चाणक्य सांगतात.आचार्य चाणक्य यांच्या मते महिला अनेक बाबतीत पुरुषांपेक्षा बुद्धिमान असतात. पुरुषांच्या तुलनेत जास्त धाडसी पण असतात.
पण त्यांनी आवश्यक शिक्षण घेऊन स्वावलंबी होणे टाळले असेल तर त्यांचे नुकसान होते. त्या गरजेच्यावेळी धाडसी कृती करण्यास धजावत नाहीत.