Friday, March 24, 2023

कोरोनानंतर आता आणखी एक नवीन संकट

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:शरीरात शिरलेल्या अमिबामुळे अमेरिकेत एका व्यक्तीचा मागच्या आठवड्यात बळी गेला. या व्यक्तीला दुर्मीळ आजार झाला होता. पुढे आजार

विकोपाला गेला आणि उपचारादरम्यान त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. हा प्रकार फ्लोरिडातील शार्लोट काऊंटीमध्ये घडला आहे. याबाबत अधिक तपास सुरू असल्याने फ्लोरिडाच्या आरोग्य

विभागाने अद्याप त्या व्यक्तीचे नाव जाहीर केलेले नाही. या व्यक्तीने रोजच्या प्रमाणेच नळाच्या पाण्याने नाक साफ केले. परंतु त्याने त्या दिवशी यासाठी पाणी न उकळताच घेतले होते. या पाण्यातूनच त्याला नेग्लेरिया

फाउलेरी या अमिबाची लागण झाली. नाकावाटे शिरकाव केलेला हा जीव नंतर मेंदूपर्यंत पोहोचतो. हा जीव मेंदूत गेला की, माणसाला प्रायमरी अमेबिक मेनिंगोएन्सेफलायटिस-पीएएम हा आजार होतो.

हा अमिबा मेंदूंच्या ऊती खाऊन नष्ट करतो. असे झाल्यास सामान्यपणे व्यक्तीचा मृत्यू ओढवतो. त्यावर डॉक्टरांना अद्याप उपाय करता आलेला नाही.हा एकपेशीय जीव सामान्यपणे तलाव, नदीमध्ये आढळतो. अशा ठिकाणी

पोहणारे, डुबकी घेणाऱ्यांना याची लागण होण्याची भीती असते. परंतु हा जीव नळावाटे येणाऱ्या पाण्यात आढळल्याचे पुरावे नाहीत.  १९६० पासून आतापर्यंत या आजाराचे एकूण १५७ रुग्ण आढळले आहेत.

यातील १५३ जणांचा मृत्यू झाला आहे.बहुतांश रुग्ण दक्षिण अमेरिकेतील राज्यांमध्ये आढळले आहेत. टेक्सासमध्ये ३९ तर फ्लोरिडामध्ये ३८ जण आढळले आहेत.

– अमिबा सामान्यपणे उष्ण ठिकाणी व उबदार पाण्यात आढळतो. परंतु अलीकडे काही रुग्ण उत्तरेकडील राज्यांमध्येही आढळले आहेत.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!