माय महाराष्ट्र न्यूज:यंदा होळीचा सण ६ मार्च रोजी साजरा केला जाणार आहे. रंगांचा हा सण दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. जर तुम्ही गर्भवती
असाल आणि तुम्हाला होळी खेळायची असेल तर काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी.१. ओली होळी खेळू नकातुम्ही गरोदर असाल तर अबीर गुलालाने कोरडी होळी खेळावी. अनेक जण पाण्याने ओली होळी
खेळतात. गरोदर महिलांनी पाण्याने होळी खेळणे टाळावे. कारण पाण्याने होळी खेळत असाल तर घसरण्याचा धोका असते. यासोबतच ओली होळी खेळल्याने त्वचेची अॅलर्जी होण्याची शक्यताही वाढते.
२. हर्बल रंगांनी होळी खेळागरोदर महिलांची त्वचा अतिशय संवेदनशील असते. रसायने त्यांना हानी पोहोचवू शकतात. त्यामुळे होळीमध्ये हर्बल रंगांचा वापर करावा. अंगावर थोडे मॉइश्चरायझर किंवा
खोबरेल तेल लावावे. त्यामुळे त्वचेवर रंग पक्का होत नाही. ३. जास्त धावू नकाहोळी खेळताना शरीराला जास्त कष्ट देणे टाळावे. पहिल्या तिमाहीत जास्त धावण्याने गर्भपात होण्याचा धोका वाढू शकतो. होळीच्या दिवशी जास्त
काम आणि ताण घेणे टाळावे, त्याचा परिणाम तुमच्या मुलावरही होतो.यासोबतच एखाद्या ठिकाणी इतर लोक नाचत असतील तर त्या ठिकाणच्या लोकांपासून थोडे अंतर ठेवावे, कारण डान्स करताना अनेक वेळा धक्का बसण्याची भीती असते.
४. जेवणाची काळजी घ्या होळीमध्ये रंग खेळण्यासोबतच आहाराचीही काळजी घ्यायला हवी. तुम्ही जास्त तेलकट पदार्थ खाऊ नये कारण यामुळे तुमचे आरोग्य बिघडू शकते. त्यामुळे तुम्ही हे पेय टाळावे.
५. पूर्ण बाह्यांचे कपडे घालाहोळी खेळताना पूर्ण बाह्यांचे कपडे घालावेत. असे केल्याने तुमची त्वचा हानिकारक रंगांपासून सुरक्षित राहील. जास्त घट्ट कपडे घालू नका.