Saturday, September 23, 2023

कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ.कौशिक “इमिनंट शास्त्रज्ञ” पुरस्काराने सन्मानित

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:भेंडा येथील श्री. मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्था संचलित कृषि विज्ञान केंद्र दहिगाव-ने चे प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ.श्यामसुंदर कौशिक यांना “इमिनंट शास्त्रज्ञ” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

डॉ. कौशिक हे मागील ७ वर्षापासून केव्हीके दहिगाव-ने मध्ये प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी प्रबंधनाच्या संयोगाने तसेच कृषि विज्ञान केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संयोगाने शाश्वत ऊस, भात, तूर, गहु उत्पादन तंत्रज्ञान, रुंद सरी वरंबा पद्धती, विविध जातींचा प्रचार प्रसार संचार, माहिती तंत्रज्ञानाच्या साहाय्याने विविध पिकांसाठी मोबाईल ॲप जसे की ऊसतंत्रकेव्हीकेडी,कापूसतंत्रकेव्हीकेडी, डाळिंबतंत्रकेव्हीकेडी, कांदातंत्र केव्हीकेडी त्याचप्रमाणे जैवसंतृप्त वाणांचा प्रचार व प्रसारमध्ये उल्लेखनीय कार्य केलेले आहे. त्या अनुषंगाने महात्मा गांधी,चित्रकुट, ग्रामोदय विश्वविद्यालय,चित्रकुट येथे आर.एस. कृषि शोध संस्थान प्रयागराज आयोजित कार्यशाळेमध्ये मध्य प्रदेशचे कृषि मंत्री कमल पटेल, राजमाता कृषि विद्यापीठ ग्वालियरचे कुलगुरू डॉ. अरविंद कुमार शुक्ला, महात्मा गांधी चित्रकुट ग्रामोदय विश्व विद्यालयाचे कुलगुरू डॉ. भरत मिश्रा यांच्या हस्ते इमिनंट शास्त्रज्ञ २०२३ पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.यावेळी डॉ. कौशिक यांनी नैसर्गिक शेतीची मुलभूत तत्त्वे आणि पद्धती या विषयावर मार्गदर्शन केले. इमिनंट शास्त्रज्ञ पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री.मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे

अध्यक्ष माजी आ.नरेंद्र घुले पाटील, विश्वस्त माजी आ. चंद्रशेखर घुले पाटीलयांनी अभिनंदन केले.

पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ. कौशिक यांचा सत्कार.

डॉ. श्यामसुंदर कौशिक यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल शिक्षण संस्थेचे विश्वस्त व लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी कारखान्याचे संचालक शिवाजीराव कोलते, माजी संचालक रावसाहेब निकम,कार्यकारी संचालक अनिल शेवाळे, सचिव रवींद्र मोटे, मुख्य शेतकी अधिकारी सुरेश आहेर आदी उपस्थित होते.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!