माय महाराष्ट्र न्यूज: सोलापूर जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक केंद्र सोलापूर यांच्या वतीने 03 मार्च रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे
आयोजन करण्यात आले आहे. सोलापूर जिल्ह्यातील नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने हा मेळावा आयोजित केला असल्याची माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता
विभागाचे सहायक आयुक्त सचिन जाधव यांनी दिली आहे. या रोजगार मेळाव्यातून 10 वी, 12 वी, ट्रेनी, आय.टी.आय. वेल्डर, फिटर, डिप्लोमा, ग्रॅज्युएट, ऑफिस असिस्टंट, कोणतीही पदवी, टेलिकॉलर, इलेक्ट्रीशियन अशा उमेदवारांना नोकरीची
संधी प्राप्त करता येईल. एकूण 800 रिक्तपदांसाठी हा रोजगार मेळावा होणार आहे. 5 उद्योजकांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने रिक्तपदे अधिसुचीत केलेली आहेत.
नोकरी इच्छुक उमेदवारांनी सदर संकेतस्थळावर नोंदणी पूर्ण करून शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्तपदांसाठी ऑनलाईन अर्ज करावेत, जेणेकरून त्यांना मेळाव्यात सहभागी होता येईल. तसेच याबाबत काही अडचण आल्यास कार्यालयाच्या
0217-2950956 या दूरध्वनीवर अथवा प्रत्यक्ष जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नॉर्थ कोट, पार्क चौक, सोलापूर येथे संपर्क साधावा.अशा रोजगार मेळाव्यातून जवळपास अनुभव बघून उमेदवारांना पगार मिळत असतो.
साधारणपणे 10 ते 15 हजार इतका महिना पगार उमेदवारांना मिळू शकतो. शिवाय ऑनलाइन मेळावा असल्याने विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होणार आहे. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी आपला रिझ्युम रेडी केला नसेल त्यांनी तो तयार करावा आणि यामध्ये सहभागी व्हावे.
शिवाय निवडलेल्या उमेदवारांना त्यांच्या मोबाईल नंबर वर फोन येऊन त्यांना नोकरीची संधी मिळू शकते, असंही सचिन जाधव यांनी सांगितले.