माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील नेहरू युवा केंद्रातील मुख्यालय व तालुक्यातील अधिनस्त कार्यालयात ‘राष्ट्रीय स्वयंसेवक’ या पदाच्या ३० जागा
भरण्यात येणार आहेत. यासाठी इच्छूक तरूणांनी ९ मार्च २०२३ पूर्वी अर्ज सादर करावा. असे आवाहन नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
या पदासाठी अर्ज करण्यासाठी इयत्ता १० वी पास ही किमान शैक्षणिक अर्हता आहे. १ एप्रिल २०२३ रोजी उमेदवाराचे वय १८ ते २९ वर्ष असावे. निवड झालेल्या स्वयंसेवकांना प्रत्येक महिन्याला ५ हजार रूपये
मानधन देण्यात येईल. नियुक्ती केवळ एका आर्थिक वर्षाकरीता असून जास्तीत जास्त एक वर्ष मुदतवाढ उत्कृष्ट कार्याच्या आधारे मिळू शकते. परंतू कोणत्याही स्थितीत दोन वर्षा पेक्षा जास्त कार्यकाळ राहणार नाही.
आपला अर्ज ‘नेहरू युवा केंद्र संगठन ’च्या www.nyks.nic.in या संकेतस्थळावर ऑनलाईन सादर करावा. ऑनलाईन अर्जाची प्रत किंवा आवश्यक कागदपत्रासह अर्ज नेहरू युवा केंद्र,
अहमदनगर ९ मार्च २०२३ पूर्वी सादर करावा.साधारण प्रत्येक तालुक्यासाठी प्रत्येकी २ पदे व संगणकीय कामाकरिता जिल्हा मुख्यालयात २ असे एकूण ३० पदे भरावयाची असून त्या-त्या तालुक्यातील
उमेदवारांनी रहिवासी पुरावा तथा आयश्यक प्रमाणपत्रासह अज करावेत. असे आवाहन ही जिल्हा युवा अधिकारी यांनी केले आहे.