Thursday, December 7, 2023

सरकारच्या ‘या’ योजनेत महिलांना मिळणार दरमहा १,००० रुपये

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:सरकारकडून महिलांसाठी अनेक योजना राबविल्या जातात. एक योजना अशी आहे या योजनेतून सरकार महिलांसाठी १ हजार रुपये प्रति महिना देत आहे.

या योजनेंतर्गत ८,००० कोटी रुपयांचे बजेट देण्यात आले असून अर्जाची तारीख ५ मार्चपासून सुरू होत आहे. या योजनेसाठी पात्र असणारे ५ मार्चपासून अर्ज करू शकतात.

ही योजना मध्य प्रदेश सरकारने जाहीर केली आहे. ही लाडली बहना योजना आहे, जी प्रत्येक महिन्याच्या १० तारखेला महिलांच्या खात्यावर १,००० रुपये पाठवते.

मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या मते, ही योजना महिलांसाठी क्रांतिकारी ठरेल आणि त्यांच्या जीवनात मोठा बदल घडवून आणेल.

या योजनेंतर्गत ५ मार्चपासून फॉर्म भरले जाणार असून त्यासाठी प्रत्येक गावात शिबिरे घेण्यात येणार आहेत. या योजनेंतर्गत महिलांची तीन श्रेणींमध्ये विभागणी करण्यात आली आहे.

प्रथम श्रेणी अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना ही रक्कम दिली जाईल. दुसऱ्या श्रेणीत पाच एकर किंवा त्यापेक्षा कमी जमीन असलेल्या महिला आणि तिसऱ्या श्रेणीमध्ये अडीच लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या महिलांना लाभ दिला जाईल.

ही योजना फक्त मध्य प्रदेशातील नागरिकांसाठी सुरू करण्यात आली आहे. इतर कोणत्याही राज्यातील लोक त्याचा लाभ घेऊ शकत नाहीत.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!