Friday, March 24, 2023

लग्नासाठी नवरा-बायकोच्या वयात किती अंतर पाहिजे? सायन्स काय सांगतं?

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:हल्ली लग्नाचा सिझन सुरु आहे. काही लोक प्रेम विवाह करतात तर काही लोक आजही अरेंज मॅरेज करत आहेत. पण या सगळ्यात बऱ्याचदा लोक कॉमन प्रश्व उपस्थीत

करतात, तो म्हणजे दोघांमधील वयाचा फरक. आपल्याकडे अनेक वर्षांपासून हे चालत आलेलं आहे आणि मोठी माणसं देखील नेहमीच सांगतात की मुलगी ही मुलापेक्षा लहान असावी.

लोकांनी लग्नासाठीच्या संकल्पना आणि वयाचा फरक या सगळ्या गोष्टी आपल्या सोयीनुसार बदलल्या असल्या तरी देखील आधी-पासून सुरु असलेल्या या वयोमर्यादाच्या बाबतीत सायन्स काय सांगतो, याबद्दल तुम्हाला माहितीय?

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार मुलगा आणि मुलीमधील अंतर हे लग्नासाठी जास्त असावं, मुलाचं वय हे मुलीच्या वयापेक्षा जास्तच असावं. त्यात नवरा हा बायकोपेक्षा वयाने ४ ते ६ वर्षाने मोठा

असावा आणि हेच आयडीअल वय असल्याचं सांगितलं जातं.यामागे बायोलॉजिकल आणि सायकोलॉजिकल तर्क लावला गेला आहे. जे खूप रिलेवंट देखील आहे.महिला या पुरुषांपेक्षा

वयाच्या ३ ते ४ वर्षांआधीच शरीराने मॅच्युअर होतात. तसेच महिलांमध्ये असलेल्या होर्मोन्समुळे महिलांचं वय जास्त लवकर वाढू लागतं, ज्यामुळे महिला लवकर म्हाताऱ्या देखील होऊ लागतात, या तुलनेत पुरुष वयाच्या

उशीरा म्हातारे होतात. त्यामुळे वयातील फरक हा नवराबायोकांच्या नात्यासाठी चांगलं राहिल असंच सायन्स सांगतं.या आयडिअल एज गॅपमुळे नवरा-बायकोंमधील आकर्षण टिकून राहातं, त्यांना

एकमेकांत कमी जाणवत नाही ज्यामुळे त्यांचं नातं जास्त फुलतं.काही केसेसमध्ये संशोधकांना असं देखील आढळलं की जबाबदारीच्या बाबतीत देखील महिला या पुरुषांच्या तुलनेत जास्त लवकर जबाबदार बनतात.

त्यामुळे महिलाचं वय लग्न करण्यासाठी कमी असलं तरी त्या नवऱ्याला सांभाळू शकतात शिवाय ते आपलं घर देखील सांभाळू शकतात.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!