माय महाराष्ट्र न्यूज:लोकायुक्त पोलीस आणि कर्नाटक सरकारच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून भाजपच्या विद्यमान आमदाराच्या
मुलाला लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. ही कारवाई करण्यात आली त्यावेळी आमदाराचा मुलगा एका खासगी कार्यालयात बसला होता. त्यानंतर त्याला 40 लाखांची
लाच घेताना लोकायुक्तांकडून पकडण्यात आले आहे. याप्रकरणी भाजपचे आमदार विरुपक्षप्पा यांचा मुलगा प्रशांत मादाल याला ताब्यात घेण्यात आले आहे.आमदार मदल विरुपक्षप्पा हे कर्नाटकमधील
सोप्स आणि डिटर्जंट्स लिमिटेडचे अध्यक्ष आहेत. त्यांचा मुलगा प्रशांतच्या विरोधात लाच मागितल्याप्रकरणी एका व्यक्तीने तक्रार दाखल केली होती.आमदाराचा मुलगा लाच घेत असल्याचा आरोप
केल्यानंतर या प्रकरणी लेखी तक्रारही दाखल करण्यात आली होती. या तक्रारीमुळेच लोकायुक्तांनी सापळा रचून प्रशांतला रंगेहाथ पकडले आहे. त्यानंतर त्याला अटकही करण्यात आली केली. यावेळी प्रशांतकडून
40 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत.या प्रकरणाची माहिती देताना लोकायुक्त अधिकाऱ्याने सांगितले की, “आम्ही प्रशांतच्या कार्यालयाची तपासणी केली आहे. आणि तिथून 1.7 कोटी
रुपये ताब्यात घेण्यात आले आहेत.प्रशांत आणि त्याच्या वडिलांच्या नावाने लोकांकडून लाच घेत असल्याचा आरोपही त्याच्यावर केला गेला आहे. त्यांच्या कार्यालयात सापडलेल्या पैशांची
सध्या चौकशी सुरु असून या प्रकरणाती आणखी कोण कोण आहेत त्याचीही चौकशी करण्यात येत आहे.