Friday, March 24, 2023

मोठी बातमी! अंगणवाडी सेविकांची इतके टक्के पगारवाढ होणार

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अंगणवाडी सेविकांची २० टक्के पगारवाढ होणार आहे. याबाबत मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी माहिती दिली आहे. अंगणवाडी सेविका मानधन वाढ अर्थसंकल्प अधिवेशनात

होईल. वीस टक्के पगार वाढ केली जाणार असून मे महिन्यापर्यंत २० हजार अंगणवाडी सेविकांची भरती करणार असल्याचे त्यांनी नमूद कले.राज्यातील अंगणवाडी सेविकांनी आपल्या मागण्यांसाठी

आंदोलन केले आहे. मुंबईतील आझाद मैदावर आंदोलन करणाऱ्या अंगणवाडी सेविका आक्रमक झाल्या होत्या. आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत मैदान सोडणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला होता. राज्य

सरकारकडून साडेपाच तर केंद्राकडून गेली साडेचार वर्षात मानधनात वाढ झालेली नाही. त्याचबरोबर इतर मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका यांनी कामबंद आंदोलन केले होते.दरम्यान, अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नावरून विधानसभेत गदारोळ

निर्माण झाला. विधानसभेचे कामकाज सुरु असताना अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नावरून विरोधक आक्रमक झाले. विरोधकांनी सभात्याग करत विधीमंडळाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी केली. अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांवरून विरोधक

आक्रमक झाले आहेत.अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज पाचवा दिवस आहे. आज प्रश्नोतरच्या तासात अंगणवाडी सेविकांचा विषय होता. जवळपास 100 सदस्यांनी हा प्रश्न उपस्थित केला. 100 सदस्य प्रश्न

उपस्थित करून देखील मंत्री बघू बघू म्हणत असतील हे योग्य नाही. ज्या घोषणा तोंडी केल्या जातायत त्याची सरकार अंमलबजावणी करत नाहीत. असा आरोप करत विरोधकांनी आक्रमक भूमिका मांडली.

दरम्यान, महिला बालकल्याण विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मोठी घोषणा केली आहे. मे महिन्यापर्यंत 20 हजार अंगणवाडी सेविकांची मेगा भरती होणार आहे. अंगणवाडी सेविकांचा २० टक्के पगार वाढ केली

जाणार आहे. अंगणवाडी सेविकांना नवीन मोबाईल खरेदी करण्यासाठी १५० कोटी खर्च केले जाणार आहेत. मनपा क्षेत्रात २०० कंटेनर अंगणवाड्या सुरू करणार. अंगणवाडी भाड्डेदर वाढवला जाणार आहे. अशी माहितीही लोढा यांनी दिली आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!