Saturday, September 23, 2023

गौतमी पाटीलचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल अखेर गुन्हा दाखल

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: आपल्या नृत्याने सर्वांना घायाळ करणारी नृत्यांगणा म्हणजे गौतमी पाटील गौतमीच्या प्रत्येक कार्यक्रमात राडा होतच असतो. पण गेल्या काही दिवसांपूर्वी एका

कार्यक्रमादरम्यान गौतमी कपडे बदलत असताना ते शूट करुन त्याचा व्हिडीओ व्हायरल करण्यात आला होता. आता पोलिसांनी याप्रकरणाची दखल घेत गुन्हा नोंद केला आहे.गौतमी पाटीलचा

फेक इन्स्टाग्राम आयडी तयार करुन त्यावर व्हिडीओ पोस्ट केल्याप्रकरणी पुण्यातील विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 24 फेब्रुवारीला कार्यक्रमादरम्यान अज्ञात व्यक्तीने गौतमी पाटीलचा

अर्धनग्न व्हिडीओ शूट केला. त्यानंतर तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला. त्यानंतर गौतमी पाटीलच्या अन्य सहकाऱ्यांचे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याप्रकरणी गौतमी पाटील सोबत डान्स करणाऱ्या एका मुलीने

विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मुलीच्या तक्ररीची दखल घेत विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. विमानतळ

पोलिसांनी या प्रकरणी कॅमेरा समोर बोलण्यास नकार दिला आहे. गौतमीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भारती विद्यापीठ पोलीस ठाणे, पुणे येथे तक्रार नोंदवण्यात आली असल्याचं वृत्त समोर आलं होतं. गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे

पुण्यात आयोजन केले होते. दरम्यान ती कपडे बदलत असतानाचा व्हिडीओ शूट करुन सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. गौतमीची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली असल्याने

तिला बदनाम करण्यासाठी तिचा व्हिडीओ शूट केल्याची चर्चा आहे.व्हायरल व्हिडीओ प्रकरण सध्या सोशल मीडियावर चांगलंच चर्चेत आहे. या प्रकरणावर अनेक तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!