Saturday, January 22, 2022

एका मंत्र्याबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटालांचा खळबळजनक दावा

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असलं तरी महाविकास आघाडीतील घटकपक्षांमध्ये मात्र अनेकदा विसंवाद पाहायला मिळतो. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तर एका मुलाखतीत काँग्रेसला उत्तर प्रदेशातील जमीनदाराची उपमा दिली आहे.

त्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस नेत्यांमध्ये टीका-टिप्पणी सुरु आहे. तर दुसरीकडे भाजप नेत्यांकडूनही काँग्रेसला टोले लगावले जात आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीतील एका नेत्याबाबत खळबळजनक दावा केलाय.

उद्धव ठाकरे यांनी भरचौकात थोबाडीत मारली तरी आम्ही सत्ता सोडणार नाही, अशा शब्दात सरकारमधील मित्र असलेल्या एका वरिष्ठ मंत्र्यांने आपल्याकडे भावना वक्त केल्याचा गौप्यस्फोट चंद्रकांत पाटील यांनी केलाय. त्यामुळे कितीही कुरबुरी झाल्या तरी ते सत्ता सोडणार नाहीत, असा टोलाही पाटील यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांना लगावला आहे.

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी नेमक्या कोणत्या नेत्याबाबत हा गौप्यस्फोट केला आहे, याबाबत नेमका अंदाज बांधणं कठीण आहे.दरम्यान ‘उत्तर प्रदेशमध्ये जमीनदार आहेत. त्यांच्याकडे मोठी शेती आहे. गावामध्ये त्यांच्याकडे हवेली असते. सिलिंगचा कायदा आला आणि त्यांच्याकडच्या हजारो एकर जमिनी गेल्या.

पण हवेली आहे, तशीच आहे. आता त्या हवेलीची दुरुस्ती करण्याची ताकदही त्या जमीनदारांमध्ये उरली नाही. हजार एकर जमिनी आता 15-20 एकरवर आल्या आहेत. सकाळी जमीनदार उठतो, आणि हवेलीच्या बाहेर जाऊन बघतो. त्याला आजूबाजूला हिरवं पिक दिसतं.

तेव्हा तो हे सर्व हिरवं पिक माझं होतं, असं सांगतो. माझं होतं. आता नाही, असं सांगत पवारांनी काँग्रेसची आजची स्थिती विषद केली.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!