Friday, January 21, 2022

नगरमधून इशारा अन्यथा अखिल भारतीय मराठा महासंघ राहुल गांधी यांच्या घरावर मोर्चा काढणार

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर : मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात रद्द झाल्यानंतर महाराष्ट्रात मराठा समाजबांधवांना आरक्षण मिळण्यासाठी अखिल भारतीय मराठा महासंघाची भूमिका काय? यासंदर्भात संपुर्ण राज्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा सुरु आहे.

मात्र, राज्यातील काही राजकीय मंत्री मराठा आरक्षणाला विरोध करीत आहे. अशा मंत्र्याच्या विरोधात मराठा महासंघाच्या वतीने ठोस भूमिका घेण्यात येणार आहे.काँग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार मराठा आरक्षणावरुन बेताल वक्तव्य करीत आहे. यामुळे दोन समाजात दरी निर्माण केली जात आहे.

हे बेताल वक्तव्य काँग्रेसच्या दृष्टीने धोक्याचे असल्याचे सुचक वक्तव्य अखिल भारतीय मराठा महासंघाचे नवनिर्वाचित उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष संभाजीराजे दहातोंडे पाटील यांनी केले. तर वडेट्टीवार यांचे बेताल वक्तव्य न थांबल्यास थेट काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या घरावर अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने मोर्चा काढण्याचा इशारा त्यांनी दिला.

अखिल भारतीय मराठा महासंघाच्या जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक शहरातील शासकीय विश्रामगृह येथे पार पडली. यावेळी दहातोंडे पाटील बोलत होते. पुढे बोलताना दहातोंडे पाटील म्हणाले की, सत्तेसाठी राजकारण नसून, मराठा महासंघाच्या माध्यमातून समाजासाठी कार्य करत आहे.

मराठा महासंघाच्या स्थापनेला 120 वर्षे झाले असून, रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहे. मराठा महासंघाच्या मुख्य कार्यालयाची मुंबई, गीरगावला इमारत बांधली जात असल्याची माहिती दिली. अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने देण्यात आलेली जबाबदारी निश्‍चितपणे पेळवली जाणार आहे. मराठा महासंघाचे अध्यक्ष प्रा. शशिकांत पवार यांनी मोठा विश्‍वास दाखवून महत्त्वाच्या जबाबदार्‍या सोपविल्या असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मुंबई येथे नुकत्याच झालेल्या बैठकीत संभाजीराजे दहातोंडे पाटील यांची राज्य संपर्कप्रमुख तसेच उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!