Monday, January 17, 2022

महसूलमंत्री थोरात म्हणाले या बाबतीत शंका बाळगण्याचे कारण नाही ….

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:‘एकेकाळी देशभर पसरलेल्या काँग्रेसची अवस्था सध्या उत्तर प्रदेशच्या एखाद्या जमीनदाराच्या मोडकळीस आलेल्या हवेलीसारखी झाली आहे’, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली होती. त्यावर काँग्रेसमधून विविध प्रतिक्रिया येत आहेत. पक्षातील ज्येष्ठ नेते, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

 यांनीही आपल्या स्वभावाला साजेशी संयमित प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘काँग्रेस ही एक विचारधारा आहे. त्यावर सध्या धर्मांधतेचा व्हायरस आला आहे. मात्र, यातून काँग्रेस नक्कीच बाहेर पडेल. पवार यांनी त्यांच्या पद्धतीने मांडणी केली असून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही त्यांच्या पद्धतीने उत्तर दिलेले आहे, त्यांच्यावर मला काही बोलायचे नाही,’ असे थोरात म्हणाले.

संगमनेर येथे एका कार्यक्रमासाठी थोरात आले होते. त्यावेळी पत्रकारांनी त्यांना या विषयावर विचारले असता थोरात म्हणाले, ‘काँग्रेस हा केवळ पक्ष नसून राज्यघटनेच्या मूलभूत तत्वाशी निगडीत असलेली एक विचारधारा आहे. आज कदाचित कठीण परिस्थिती आली असेल, ती विचारधारेला आलेली आहे. धर्मांधता आणि जातीयवादाचा व्हायरस आज देशात घुसलेला दिसत आहे.

म्हणून कठीण परिस्थितीत आम्ही दिसत असू मात्र एक दिवस काँग्रेस पुन्हा उभारी घेईल, या बाबतीत शंका बाळगण्याचे कारण नाही. कोणीही तशी शंका बाळगू नये. शरद पवार यांनी त्यांच्या पद्धतीने मांडणी केली आहे. मात्र, या धर्मांधतेच्या व्हायरसमुळे काँग्रेसवर ही वेळ आल्याचे सर्वांनी ओळखून घेतले पाहिजे. हा व्हायरस काढून टाकण्याची जबाबदारी एकट्या काँग्रेसची नाही.

‘राज्य घटना आणि लोकशाही टिकविण्यासाठी या देशातील प्रत्येक नागरिकाची ती जबाबदारी आहे. नाना पटोले आमचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांनी त्यांच्या पद्धतीने यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यावर मी बोलू इच्छित नाही. मात्र, ही विचारधारेची लढाई आहे. आपल्याला देश कशा पद्धतीने चालवायचा आहे, आपली लोकशाही, आपली राज्यघटना कशी वाचवायची

यासाठी आमची ही लढाई शेवटपर्यंत चालू राहील. आम्ही यात हार मानणार नाही, लढाई करत राहू,’ असेही थोरात एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले.

ताज्या बातम्या

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...

या आमदाराची जीभ घसरली! रस्ते कंगना राणौतच्या गालापेक्षा चांगले करणार

माय महाराष्ट्र न्यूज:अभिनेत्री कंगणा रणौतविषयी वादग्रस्त वक्तव्य करून काँग्रेस आमदार डॉ. इरफान अन्सारी वादात सापडण्याची शक्यता आहे. जामताडामधील रस्ते कंगना रणौतच्या गालापेक्षाही चिकने बनवले...
error: Content is protected !!