माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये बुधवारच्या तुलनेत जवळपास 32 हजार गोण्यांनी वाढ झाली. काल शनिवारी 81 हजार 759 गोण्या (45 हजार 786 क्विंटल) इतकी आवक झाली. जास्तीत जास्त भाव 1800 रुपयांपर्यंत निघाले असून ते बुधवारच्या तुलनेत 200 रुपयांनी कमी आहेत.
काल मोठ्या मालाला 1550 ते 1650 रुपयांपर्यंत भाव मिळाला. मध्यम मोठ्या मालाला 1500 ते 1600 रुपये, मध्यम मालाला 1400 ते 1500 रुपये, गोल्टा/गोल्टी प्रकारच्या कांद्याला 900 ते 1400 रुपये भाव मिळाला. जोड कांदा 300 ते 400 रुपये क्विंटल दराने विकला गेला.
उच्च प्रतिच्या कांद्याच्या एक-दोन वक्कलांना 1800 रुपये प्रतिक्विंटल भाव मिंळाला.कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली असून त्यामुळे कांद्याच्या भावातही घसरण दिसून आली.