Thursday, October 5, 2023

आता तुम्हाला QR कोड स्कॅन करून मिळणार पैसे घ्या जाणून 

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:आत्तापर्यंत तुम्ही QR कोड स्कॅन करून पेटीएम किंवा गुगल पेने पैसे देत असाल, पण आता तुम्हाला नाणीही मिळतील.

यासाठी रिझर्व्ह देशातील 12 शहरांमध्ये 19 मशीन्स बसवणार आहे. वास्तविक ही QR कोड सक्षम कॉइन व्हेंडिंग मशीन असतील. ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या मोबाईलवरून हे QR कोड स्कॅन

करून सहज नाणी मिळवू शकता. रिझव्‍‌र्ह बँकेला विश्वास आहे की, त्यांच्या मदतीने छोट्या शहरांपासून महानगरांपर्यंत लोकांना नाण्यांसाठी भटकंती करावी लागणार नाही.गेल्या महिन्यात झालेल्या एमपीसीच्या बैठकीत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर

शक्तीकांत दास यांनी चलनविषयक धोरण समितीच्या (एमपीसी) बैठकीत या मशीन्सची घोषणा केली होती. शक्तीकांत दास यांच्या मते, QR कोड-आधारित नाणे वेंडिंग मशीन लवकरच देशभरातील 12 शहरांमध्ये 19 ठिकाणी स्थापित केले जातील.

हा एक पायलट प्रोजेक्ट असेल ज्या अंतर्गत मशीनवर QR कोड स्कॅन करून नाणी काढता येतील.रिझर्व्ह बँकेने आधीच देशभरात नाणे वेंडिंग मशीन स्थापित केली आहेत. कॉइन व्हेंडिंग मशीन ही स्वयंचलित मशीन आहेत जी बँक चलनी नोटांच्या

बदल्यात नाणी वितरीत करतात. मात्र या मशीन्समधून बनावट नोटांच्या मदतीने पैसे काढले जात असल्याच्या अनेक घटना समोर आल्या होत्या. त्यानंतर रिझर्व्ह बँकेने UPI आधारित पर्याय स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे.

रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार, यूपीआयच्या माध्यमातून कॉईन व्हेंडिंग मशिन्समध्ये प्रवेश करता येतो. यामध्ये चलनी नोटा टाकण्याऐवजी, UPI द्वारे पेमेंट करण्यासाठी ग्राहकाला QR कोड स्कॅन करावा लागेल. ग्राहक त्यांच्या आवश्यकतेनुसार

मशीनमधून 1, 2, 5, 10 आणि 20 नाणी काढू शकतील. बँका ग्राहकांच्या खात्यातून पैसे कापून नाणी पुरवतील. त्यामुळे नाण्यांची उपलब्धता सुलभ होईल. पथदर्शी प्रकल्पातून मिळालेल्या अनुभवाच्या आधारे, या मशीन्सचा वापर

करून नाण्यांच्या वितरणास प्रोत्साहन देण्यासाठी बँकांना मार्गदर्शक तत्त्वे जारी केली जातील.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!