माय महाराष्ट्र न्यूज:आधार कार्डचा वापर आता प्रत्येक ठिकाणी होतो. प्रत्येक नागरिकाकडे हे महत्वपूर्ण ओळखपत्र असणे आवश्यक आहे. त्याआधारे अनेक महत्त्वाची कामे पूर्ण करता येतात.
बँक खाते उघडण्यासाठी, शाळेत प्रवेश घेताना, सिमकार्ड खरेदीसाठी, पासपोर्ट तयार करण्यासाठी, गॅस सिलेंडरची सबसिडी मिळवण्यासाठी, जवळपास अनेक कामात आधार कार्डची गरज पडते.
अनेक ठिकाणी आधार कार्ड क्रमांक मागण्यात येतो. हे ओळखपत्र प्रत्येक भारतीयांसाठी आवश्यक झाले आहे. आधार क्रमांक जारी करणारी संस्था, भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने नागरिकांच्या सुरक्षेसाठी
आणखी एक सुविधा सुरु केली आहे. आता एका एसएमएसवर आधार कार्ड लॉक-अनलॉक करता येणार आहे. त्याचा त्यांना मोठा फायदा होईल.अनेक नागरिकांना हे माहिती नाही की, आधार कार्ड सोबत वागविण्याची, बाळगण्याची
आवश्यकता नाही. त्यांना मोबाईलमध्ये आधार कार्ड डाऊनलोड करुन ठेवता येते. अथवा ई-मेलला ड्राफ्टमध्ये आधार कार्ड सेव्ह करता येते. आता युपीआय पिन सेट करण्यासाठी डेबिट कार्डची गरज नाही.
आता आधार कार्डच्या मदतीने ही तुम्ही युपीआयचा पिन सेट करु शकता.युपीआय आयडी सेट करण्यासाठी तुमच्याकडे एक बँक खाते, या खात्याशी जोडलेला मोबाईल क्रमांक असणे आवश्यक आहे. ग्राहकांकडे डेबिट कार्ड नसेल तर ते युपीआय आयडी आधार
कार्डसोबत लिंक करु शकतात. आधार ओटीपी एक सुरक्षित मार्ग मोकळा करुन देते. आधार ओटीपीच्या माध्यमातून वापरकर्त्याला त्याचा युपीआय पिन पण बदलता येतो. आधारच्या मदतीने ग्राहकाला नवीन युपीआय पिनही सेट करता येतो.