माय महाराष्ट्र न्यूज:आगामी काळात शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचाच खासदार होईल आणि तो मीच होणार,
मी असेल किंवा नसेल; पण खासदार आपलाच असेल, अशी शिवगर्जना शिवसेना संपर्कप्रमुख बबन घोलप यांनी केली.शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या
मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या शिवगर्जना अभियानास शिर्डी लोकसभा मतदारसंघात सुरुवात करण्यात आली. या अभियानानिमित्त संगमनेर व्यापारी हॉल येथे आयोजित मेळाव्यात घोलप बोलत होते. मेळाव्यासाठी या वेळी
महिला आघाडी जिल्हाप्रमुख सपना मोरे, उत्तर नगर जिल्हाप्रमुख प्रमोद लबडे, उपजिल्हाप्रमुख महेश नवले, भाऊसाहेब हासे, संजय फड, अमित चव्हाण, रावसाहेब गुंजाळ, डॉ. मनोज मोरे, संतोष मुर्तडक, नितीन नाईकवाडी, शीतल हासे,
आशा केदारी, संगीता गायकवाड, सुरेखा गुंजाळ,अमोल डुकरे, राजू गायकवाड, योगेश खेमनर, जना नागरे, लक्ष्मण सोन्नर आदी उपस्थित होते.या वेळी शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर यांनी, आता फक्त
लढायचं नाही तर जोपर्यंत जिंकत नाही, तोपर्यंत लढायचं. आता लढायचंपण आणि जिंकायचंपण असे सांगून मार्गदर्शन केले. या वेळी शिवसेना उपनेते विनोद कदम, माजी खा. सुभाष वानखेडे,
शिरोळचे माजी आ, उल्हास पाटील, युवा सेनेचे दुर्गे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक नरेश माळवे यांनी केले. सूत्रसंचालन शहरप्रमुख अमर कतारी यांनी केले. आभार जिल्हाप्रमुख मुजीब शेख यांनी मानले.