Sunday, September 26, 2021

मोठी घडामोडी; विराट कोहली कर्णधारपद सोडणार ; महाराष्ट्रातील हा खेळाडू होणार कर्णधार …

IMG-20210619-WA0049
okk
previous arrow
next arrow
IMG-20210619-WA0049
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:टी ट्वेण्टी वर्ल्ड कप तोंडावर आला असताना, टीम इंडियात मोठ्या घडामोडी घडण्याचे संकेत आहेत. कारण नव्या रिपोर्टनुसार विराट कोहली वन डे आणि T20 चं कर्णधारपद सोडणार असल्याचं म्हटलं आहे. विराट कोहलीऐवजी आता

 रोहित शर्माकडे वन डे आणि T20 चं कर्णधारपद सोपवण्यात येईल, असंही या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचं वृत्त दिलं आहे. मात्र याबाबत अधिकृत दुजोरा BCCI कडून मिळाला नाही. सध्या या प्राथमिक चर्चा असल्याचं सांगण्यात येत आहे. आगामी T20 विश्वचषकानंतर हे फेरबदल होण्याची शक्यता आहे.

टाईम्सच्या रिपोर्टनुसार, विराटच्या जागी रोहितला वन डे आणि T20 चं कर्णधार करण्याची घोषणा होऊ शकते. रोहितला ज्या ज्या वेळी संधी मिळाली, त्या त्या वेळी त्याने आपलं नेतृत्त्व सिद्ध केलं. IPL मध्येही त्याने आपल्या नेतृत्त्वाची चुणूक दाखवली होती. IPL मध्ये सर्वाधिक जेतेपदं रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सच्या नावावर आहे.

BCCI सूत्रांच्या माहितीनुसार, विराट कोहली T20 विश्वचषकानंतर स्वत: कर्णधारपद सोडण्याची घोषणा करु शकतो. आपल्या फलंदाजीवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी तो हा निर्णय घेऊ शकतो. विराट कोहली सध्या क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचं कर्णधारपद भूषवतो. मात्र आता नेतृत्त्वाची धुरा रोहित शर्मासोबत ‘शेअर’ करण्याचा निर्णय विराटने घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

यापूर्वी InsideSport.co या वेबसाईटने भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावेळी एक वृत्त दिलं होतं. त्यावेळी त्यांनी विराट कोहली हा रोहित शर्मासाठी वन डे आणि T20 चं कर्णधारपद सोडू शकतो असं म्हटलं होतं. आता ते वृत्त खरं ठरण्याची शक्यता आहे.

नव्या रिपोर्टनुसार, कोहली आणि टीम मॅनेजमेंटने मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्ये कर्णधारपदाची धुरा रोहित शर्माकडे सोपवण्याचा निर्णय जवळपास निश्चित केला आहे.दरम्यान, विराट कोहलीने आपला निर्णय BCCI ला कळवल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे रोहित शर्मालाही पूर्वकल्पना देण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

काय चालले देशात:महिला कॉन्स्टेबलवर सामूहिक बलात्कार

माय महाराष्ट्र न्यूज:महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी कठोर कायदे करुनही महिलांवरील अत्याचार कमी झालेले नाहीत. एका महिला कॉन्स्टेबलने, तीन जणांनी मिळून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा...

नगर जिल्ह्यात आज ६९५ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या इतक्या बाधितांची रुग्ण संख्येत भर

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात आज ६९५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ३० हजार ७३६ इतकी झाली...

अत्यंत म्हत्वाचे:प्रार्थनागृहे, शाळा, चित्रपटगृहांबाबत काय आहेत नवे नियम? वाचा सविस्तर

माय महाराष्ट्र न्यूज: देशातल्या कोरोना रुग्णांमध्ये घट होत असताना आता महाराष्ट्रही हळूहळू अनलॉक होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातली प्रार्थनास्थळं सात ऑक्टोबरपासून उघडण्याचा निर्णय मुख्यमंत्री...

PM kisan :शेतकऱ्यांना 10 व्या हप्त्यात 2000 रुपयांऐवजी मिळणार 4000 रुपये ?

माय महाराष्ट्र न्यूज:पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेचा फायदा घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपयांऐवजी 4000 रुपये येण्याची शक्यता आहे. मीडिया...

रोहित पवारांचा घरचा आहेर:युवकांच्या भविष्याशी खेळू नका, त्यांचे तिकीटाचे पैसे द्या

माय महाराष्ट्र न्यूज:आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन मोठा सावळा गोंधळ काल रात्री पाहायला मिळाला. हजारो विद्यार्थी परीक्षा केंद्र असलेल्या शहरात जाऊन पोहोचल्यानंतर त्यांना परीक्षा पुढे ढकलण्यात...

नगर ब्रेकींग: शेतकऱ्यासह १३ वर्षीय मुलाचा ट्रॅक्टरखाली चिरडून मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :शेतामध्ये पेरणी सुरू असताना बांधावर घातल्याने झालेल्या अपघातात पेरणी यंत्रावर बसलेल्या शेतकऱ्याचा व १३ वार्षीय मुलाचा ट्रॅक्टरखाली चिरडून मृत्यू झाला वाडेगव्हाणमधील...
error: Content is protected !!