Thursday, October 5, 2023

12वीचा गणिताचा पेपर पुन्हा होणार का नाही, राज्य शिक्षण मंडळाने केले स्पष्ट

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेसंदर्भात महत्त्वाची बातमी आहे. गुरुवारी 3 मार्च रोजी सिंदखेड राजा तालुक्यातील

एका परीक्षा केंद्रावरून 12 वीच्या गणिताचा पेपर व्हायरल झाला होता. गणिताच्या प्रश्नपत्रिकेतील दोन पानं सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.

त्यामुळे हा पेपर पुन्हा घेण्याची मागणी करण्यात येत होती. यावर राज्य शिक्षण मंडळाने स्पष्टीकरण दिले आहे.राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी स्पष्ट केले आहे की, “गणित

विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील दोन पृष्ठे सिंदखेड राजा तालुक्यातील एका परीक्षा केंद्रावरून व्हायरल झाली असल्याची बातमी वृत्त वाहिन्यावरून प्रसिध्द झाली आहे. तथापि या विषयाची प्रश्नपत्रिका

विद्यार्थ्यापर्यंत पोहोचल्याचे राज्यात कोठेही आढळून आलेले नाही. यामुळे इयत्ता १२ वी च्या गणित विषयाची परीक्षा पुन्हा घेतली जाणार नाही.दरम्यान या प्रश्नपत्रिकेतील दोन पानं सकाळी 10.30 नंतर

प्रसिद्ध झाली असून मंडळ सूचनेनुसार सकाळच्या सत्रात 10.30 वाजेपर्यंत आणि दुपारच्या सत्रात 2.30 वाजेपर्यंत परीक्षा दालनात परीक्षार्थींनी उपस्थित राहणे बंधनकारक केलेले आहे. या वेळेनंतर कोणत्याही

विद्यार्थ्याला परीक्षा दालनात प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे गणित विषयाचा पेपर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्याचे राज्यात कोठेही आढळून आलेले नाही. असे मंडळाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!