माय महाराष्ट्र न्यूज:यंदा फेब्रुवारीतच कडाक्याच्या उन्हामुळे लोक त्रस्त असताना भारतीय हवामानशास्त्र विभागाने आणखी चिंता वाढवणारा इशारा दिला आहे.
आयएमडीच्या ताज्या इशाऱ्याने उन्हाळ्यातील भीषण स्थिती दर्शविली आहे. मार्च महिन्यातच उन्हाळ्यातील तापमान 42 अंशांपर्यंत वाढू शकते असे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.
हे तापमान मार्च महिन्याच्या सामान्यपेक्षा कित्येक अंशांनी जास्त आहे.मार्च महिन्यात उत्तर भारतात तीव्र उष्णतेची लाट आणि उष्णतेच्या लाटेचा परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच यामुळे जीवही
गमवावा लागू शकतो असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. हवामान खात्याच्या या इशाऱ्यानंतर आरोग्य मंत्रालयानेही लोकांना उन्हात बाहेर पडण्यापूर्वी सतर्क राहण्याचा आणि सर्व
प्रकारची खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे.यंदा उन्हाळ्याचा कडाका चांगलाच वाढणार असल्याचे संकेत आधीच मिळाले होते. आता हवामान खात्यानेही त्याला दुजोरा दिला आहे.
उष्णतेच्या लाटेमुळे हृदयविकाराच्या घटनांमध्ये वाढ होते, त्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने हृदयाच्या रुग्णांना आपली नियमित तपासणी करून घेण्याचा सल्ला दिला आहे. याशिवाय
लोकांनी उन्हात बाहेर पडताना तोंड आणि डोके कपड्याने झाकण्याचा आणि उष्माघात टाळण्यासाठी पुरेसे पाणी आणि इतर द्रवपदार्थांचे खाण्याचा सल्ला आरोग्य मंत्रालयाने दिला आहे.