माय महाराष्ट्र न्यूज:देशातील तेल कंपन्यांनी दररोज सकाळप्रमाणे आज देखील पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहे.
अनेक राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल होताना दिसत आहेत.मात्र, दिल्ली-मुंबईसारख्या देशातील चार महानगरांमध्ये आजही इंधनाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.
बिहारमध्ये आज पेट्रोल 28 पैशांनी महागले असून ते 109.15 रुपयांनी विकले जात आहे. तर डिझेल 26 पैशांनी महागले असून त्याची किंमत 95.80 रुपये प्रति लीटर इतकी आहे. हरियाणात
पेट्रोल 26 पैशांनी तर डिझेल 25 पैशांनी वाढले आहे. हिमाचलमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 49 पैशांनी वाढ झाली आहे.तसेच झारखंड, जम्मू-काश्मीर, पंजाब आणि त्रिपुरामध्ये पेट्रोल आणि डिझेल
महागले आहे. दुसरीकडे, तेलंगणामध्ये पेट्रोल 1.48 रुपयांनी घसरून 110.35 रुपये आणि डिझेल 1.39 रुपयांनी घसरून 98.45 रुपये प्रति लिटरवर पोहोचले. राजस्थानमध्ये पेट्रोल 59 पैशांनी तर उत्तर
प्रदेशात 47 पैशांनी स्वस्त झाले आहे.तुम्ही आता घरबसल्या एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलमधून RSP आणि आपल्या शहरातील
कोड टाकून 9224992249 या क्रमांकावर मॅसेज पाठवावा लागेल.BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. HPCL ग्राहक
HPP price आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.